Home बुलडाणा रेलवेच्या धडकेने साखरखेर्डा येथील तरुण ठार

रेलवेच्या धडकेने साखरखेर्डा येथील तरुण ठार

45
0

दुःखद घटना

अमीन शाह

खामगाव , दि. २२ :- मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवकाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाला. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी स्थानिक रेल्वे स्टेशनवर घडली.
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील श्रीकांत गजानन देशमुख वय १९ हा दोन दिवसांपूर्वी घरी मित्राला भेटण्यासाठी जातो, असे सांगून घरून आला होता. मात्र त्याचा आज सकाळी ४.५० च्या सुमारास खामगाववरून जलंबकडे निघलेल्या रेल्वेखाली कटून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

Unlimited Reseller Hosting