Home मराठवाडा व्हाट्सअप ने 12 वी चा पेपर फोडला, परतुर पोलिसांनी दोन शिक्षकासह 7...

व्हाट्सअप ने 12 वी चा पेपर फोडला, परतुर पोलिसांनी दोन शिक्षकासह 7 जणांना घेतले ताब्यात

19
0

लक्ष्मीकांत राऊत

जालना , दि. २२ :- तीन दिवसांपासून 12 वीच्या परीक्षा सुरू आहेत,आज हिंदी या विषयाचा पेपर होता,परतुर च्या काही झेरॉक्स सेंटरमध्ये पालक व तरुणांची झेरॉक्स काढण्याची लगीनघाई सुरू होती,पोलिसांना याचा सुगावा लागताच झेरॉक्स चालकांवर पोलिसांनी अचानक कारवाई केली व चालक व पालक यांना ताब्यात घेतले असता व्हाट्सअप च्या माध्यमातून शिक्षकांनी पेपर फोडल्याचे उघड झाले. या प्रकरणी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या दोन शिक्षका सह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
परतुर शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात 12 च्या परीक्षा सुरु असताना महाविद्यालयाच्या दोन शिक्षकांनी मोबाईल द्वारे झेरॉक्स चालकांना प्रश्न पत्रिका पाठवून देत पेपर फोडल्याचे उघड झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रातून काही शिक्षक व्हाट्सअप च्या माध्यमातून झेरॉक्स चालकांना प्रश्न पत्रिका पाठवून त्याच्या झेरॉक्स काढल्या जात होत्या,या झेरॉक्स पालक व काही जणांचे टोळके विद्यार्थ्यांना पुरवत होते.प्रश्न पत्रिका फोडण्याचा हा प्रकार आयपीएस अधिकारी निलेश तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उजेडात आणल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी झेरॉक्स चालक,कॉपी पुरवठा करणारे तरुण व लालबहादूर शास्त्री परीक्षा केंद्रातील दोन शिक्षक मिळून 7 जणांना ताब्यात घेतले आहे.लालबहादूर शास्त्री परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या पहिल्या पेपरपासून कॉपी चा सुळसुळाट सुरू होता.शहरातील बाकी इतर केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा सुरु असताना येथे मात्र कॉपीचा मुक्त संचार पहायला मिळत होता. आता सर्व प्रकार समोर आल्याने शिक्षकासह सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
गेल्या 15 फेब्रुवारी ला परतुर पोलीस ठाण्याचा कारभार हा आयपीएस अधिकारी नीलेश तांबे यांनी स्वीकारल्यानंतर परतुर शहर व परिसरातील अवैध धंदे पुर्णतः बंद झाले.अधिकारी तांबे यांचा दरारा माहीत असताना शिक्षक व झेरॉक्स चालकांनी दाखवलेले धाडस आता त्यांच्या चांगलेच अंगलट आलेले आहे. पोलीस याबाबत पुढील कारवाई करत असून तपासात यातून आणखी काय काय बाहेर येते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Unlimited Reseller Hosting