Home जळगाव जिल्हा परिषद उर्दू शाळा केह्राळे बु येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

जिल्हा परिषद उर्दू शाळा केह्राळे बु येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

154

अध्ययन अध्यापन दुतर्फी प्रक्रिया – नंदा अमोल पाटील

रावेर (शरीफ शेख)

रावेर , दि. १७ :- तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळा केह्राळे बु. येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आला. या कार्यक्रमास संबोधित करतांना जिल्हा परिषदेच्या सदस्या मा. नंदा अमोल पाटील म्हणाले की अध्ययन अध्यापन ही दुतर्फी प्रक्रिया आहे आणि शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सहकार्य विना शिक्षणाची प्रक्रिया शक्य नाही.

अयान तडवी यांनी पवित्र कुराण पाठ केले व कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक गौस खान हबीबुल्ला खान यांनी कार्यक्रम आयोजनबाबत माहिती दिली. .
कार्यक्रमामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2019 मध्ये गुणवत्ता प्राप्त करण्याय्रा शाईस्ता शरीफ तडवी आणि सुमैय्याा राजू तडवी यांना प्रोत्साहन देण्यात आले.
तसेच सावदा येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्विझ स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करणारे शाळेचे विद्यार्थी आरिफ युनूस तडवी व सानिया फीरोज तडवी, यांचा गुण गौरव जिल्हा परिषद सदस्या श्रीमती नंदा अमोल पाटील , केह्राळे गावचे सरपंच , मा.राहुल पाटील , पोलिस पाटील मा. वर्षा ताई, उप सरपंच मा. कलीमा निजाम तडवी , शा.व्य.अध्यक्ष बाजित तडवी ,मुख्याध्यापक गौस खान, यांच्या हस्ते बक्षिस देऊन करण्यात आला. तसेच शिक्षक व नागरिकांनी विद्यार्थ्यांना पुरस्कार व भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

रफीक सर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
रावेर ब्लॉकचे गटशिक्षणाधिकारी मा. अजीत तडवी आणि विस्तार अधिकारी मा. नवाज तडवी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे फोन कॉलद्वारे अभिनंदन केले. आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नंदा अमोल पाटील (जिल्हा परिषद सदस्य), राहुल पाटील सरपंच, क्लीमा निजाम तडवी (उप सरपंच), जुगरा महेबूब तडवी,माजी पंचायत समिती सदस्या, बाजित तडवी, अमीन शाह, मौलाना जाकीर साहेब, व असंख्य पालक व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रफीक शेख व अलीम शेख यांनी परिश्रम घेतले . सुत्रसंचालनाची जबाबदारी अलीम शेख यांनी पार पाडली.