Home उत्तर महाराष्ट्र मुस्लिम मंच चे आज सोमवारी उपोषणाची अर्धशतकी होणार

मुस्लिम मंच चे आज सोमवारी उपोषणाची अर्धशतकी होणार

150

५१ व्या दिवसापासून साखली उपोषणाचे नामांतर होऊन धरणे आंदोलन होणार

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच च्या साख़ली उपोषणास २३डिसेंबर १९ पासून जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या उपोषणाचा सोमवार हा ५० वा दिवस असून हा दिवस जळगाव शहरातील सर्व मशिदीचे इमाम व जमियत उलमा हिंदी चे सर्व पदाधिकारी सक्रिय सहभाग घेऊन भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणार आहेत .
जळगाव मधे ही एतेहसिक बाब म्हणून नोदली जाईल की ५० दिवस उपोषण सुरु असून त्याची अर्ध शतकी पूर्ण होत आहे.

*साखळी उपोषणाचे धरणे आंदोलनात रूपांतर*

मंगळवार ५१ व्या दिवसापासून साखळी उपोषण हे नाव बदलून त्यास धरणे आंदोलन असे नामकरण करण्यात येणार असल्याचे जळगाव मुस्लिम मंच समन्वयक फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे धरणे आंदोलन हे दररोज ११ ते २ वाजेपर्यंत चालू राहणार असून रविवार फक्त बंद राहणार आहे तरी सर्व उपोषणार्थि व जिल्ह्यातील सर्व समाजाच्या बांधवांनी नोंद घ्यावी व या धरणे आंदोलनास यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहे.

*सक्रीय सहभागासाठी आवाहन*

नवीन संस्था, मंडळ, संघटना व बिरादरी आदींनी धरणे आंदोलनात आपले सक्रिय उपस्थिती साठी नावे नोंदवावी व हे आंदोलन अजून वर्षभर चालेल या प्रमाणे नियोजन करण्यात येत असल्याने त्यात जास्तीत जास्त संघटनांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान सुद्धा मुस्लिम मंच तर्फे करण्यात आलेले आहे.