Home विदर्भ अंजुमन उर्दू हायस्कुल मध्ये स्नेहसंम्मेलनाचे आयोजन…!!

अंजुमन उर्दू हायस्कुल मध्ये स्नेहसंम्मेलनाचे आयोजन…!!

55
0

यवतमाळ , दि. 17 :- (वसीम शेख) काल दिनांक 15/02/2020 रोजी स्थानीय अंजुमन उर्दू हायस्कुल च्या भव्य प्रागंनामध्ये स्नेह संम्मेलनाचे आयोजन मोठया उत्साहाने करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणी सर्व सदस्य प्रमुख पाहुने म्हणुन उपस्थीत होते.

कार्यक्रमाची सुरूवात पवित्र कुराणाचे पढन करुन करण्यात आले तसेच नात शरीफ चे गायन विद्यार्थीव्दारे सादर करण्यात आले.
वर्ग ५ ते १० वी च्या सर्व विद्यार्थांने या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी घेवुन विविध देशभक्ती गीतं, ड्रामे, कव्वाली आणी ॲक्शन सॉग सादर करुन पालकांना व स्त्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन विद्यार्थांचे सुप्त गुणाची दर्शन होवुन त्याची कला जगासमोर आणने तसेच त्यांचे मनोबल वाढुन त्यांच्यामध्ये समाजकार्याची भावना निर्माण करणे हा मुख्य हेतु होता.

कार्यक्रमाचे संचालन वर्ग १० वी च्या विद्यार्थीनीने केला तसेच शेवटी सर्व विद्यार्थी व आलेले त्यांचे पालकांन साठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाठण्याकरीता शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकगण आणी सर्व कर्मचा-यांनी अथक परीश्रम घेवुन स्नेहसंम्मेलनाचे कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडले.