Home जळगाव डॉ. लाजरी धांडे झाली फिजिओथेरपिस्ट

डॉ. लाजरी धांडे झाली फिजिओथेरपिस्ट

71
0

शरीफ शेख

रावेर , दि. १७ :- तालुक्यातील मुळ खानापूर येथील रहिवासी व सध्या रावेरातील अष्टविनायक नगरात राहणारी लाजरी युवराज धांडे हिने बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण करून प्राविण्य प्राप्त केले आहे. या बाबतचा पदवीदान समारंभ नुकताच महाविद्यालयात पार पडला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिला याबाबत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे श्री. राहुल गिरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. लाजरी हि वीज कंपनीचे मोरगाव सबस्टेशन येथील ऑपरेटर युवराज धांडे यांची कन्या आहे.