Home मराठवाडा धर्माबादच्या पोलिस निरिक्षकांनी टाकले अवैध धंद्यांवर धाडि…!!

धर्माबादच्या पोलिस निरिक्षकांनी टाकले अवैध धंद्यांवर धाडि…!!

110
0

राजेश भांगे

माझा भागात अवैध धंदे चालणार नाहीत – सोहन माछरे “

नांदेड , दि. १७ :- जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात छुप्या पद्धतीने चालू असलेले धंदे मटका , जुगार अवैध मद्यविक्रि व ईतर अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांन विरोधात धर्माबाद पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन तालुक्यातील ठिक ठिकाणी धाडि टाकून अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धर्माबाद तालुक्यात कुठल्याही पद्धतीने अवैध धंदे चालू देणार नाहि व कायद्याचे उलंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलिस निरिक्षक सोहन माछरे यांनी मिडिया , पत्रकारांशी बोलताना दिले.

धर्माबाद तालुक्यातील विविध बिट अंतर्गत अवैध धंदे फोफावल्याचे लक्षात येताच पोलिस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरिक्षक अनिल सनगले यांच्यासह पोलिस हवलदार व्हि. एस.स्वामी, एस बी कदम, श्यामसुंदर भवानगिरकर, बी.डि. रेणके , नाईक, एन.जी.बोगरे आदिंच्या पथकाने विविध ठिकाणी चालत असलेल्या मद्यविक्रि ,जुगार व मटका घेणाऱ्या आरोपीं विरोधात धडक कार्यवाही करून जेरबंद केले . सदर मोहिमेत आता पर्यंत एकुण सहा ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडित 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असुन . धर्माबाद पोलिसांनी अवैध धंदे चालविणाय्रांन विरोधात धाडसत्र ची धडक मोहिम चालवली असल्याने या मोहिमेची सर्वच स्तरातुन कौतुक होत असुन या धाडसत्र मोहिमेने अवैध धंद्याना आळा बसणार आहे.

Previous articleएका सिगरेट साठी त्याने केली हत्या
Next articleजिल्हा परिषद उर्दू शाळा केह्राळे बु येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here