महत्वाची बातमी

एका सिगरेट साठी त्याने केली हत्या

Advertisements

अमीन शाह

रत्नागिरी , दि. १६ :- सिगारेटचे दहा रुपये देण्यावरुन झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी वॉचमन ची हत्या केल्याची खळबळजन घटना घडलीय. एका बिअर शॉपीचा तो वॉचमन होता. वॉचमनचा गळा चिरणाऱ्या आरोपीचं धक्कादायक CCTV फुटेजही व्हायरल झालं आहे. ही घटना आहे महाड तालुक्यातलल्या दासगाव भागत घडलीय. यात दासगाव मधल्या लीना कळमकर यांच्या देशी दारु आणि बिअर शॉपीमध्ये वॉचमन म्हणून असलेल्या दिलीप साळवी यांची अशी निर्घृण हत्या करण्यत आली.

ही त्या करणाऱ्या मयुरेश पड्याळ या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय . विशेष म्हणजे हा आरोपी महिलेच्या वेशात आला होता आणि वॉचमन झोपेत असतानाच त्याने त्याचा गळा चिरला. घटनेच्या दिवशी मयुरेश हा बारमध्ये आला होता. त्याने दारु घेतली होती. नंतर त्याने सिगारेट घेतली. मात्र त्याचे पैसे तो देत नव्हता.
त्यातून त्याचं आणि मालकाचं भांडण झालं. नशेत असलेला मयुरेश हा काही पैसे देत नव्हता. त्यांचं भांडण सुरु असतानाच वॉचमन असलेले दिलीप साळवी हे मध्ये पडले आणि त्यांनी मयुरेशला पैसे देण्यास सागीतल
पहाटे अडीचच्या दरम्यान त्याने मुलीचा ड्रेस घातला होता. तोंडावर कापडही बांधलं होतं. बारच्या बाहेर साळवी झोपले होते. मयुरेश त्यांच्याजवळ आला आणि ते झोपेत असतानाच धार धार शस्त्राने त्याने साळवींचा गळा चिरला. या घटनेमुळे सर्व परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...