पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
नांदेड , दि.१६ :- रोजी कासराली येथील चि. एस. पी. गुलवार यांचा विवाह चि. सो.का. सुषमा ऊर्फ राणी याच्याशी दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी कासराली येथे संपन्न झाला.त्या आगोदर नवरा व नवरी यांनी निश्चिंय केला की जीवननातील एकमेकांना साथ जन्मी साथ देण्या आगोदर आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्याचे ठरवले होते.
त्याचं प्रमाणे देगलूर येथिल नांदेड डाक टीम अत्याधुनिक तंत्रज्ञान सह भर मंडपात पोहचली आणि नवर व नवरीचा आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर घेतला आणि काही मिनिटात दोघांचेही इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडून देऊन त्यांना डिजिटल पोस्ट बँकेचे खाते पास बुक देण्यात आले. आणि नवरा व नवरीला डाक विभागाच्या वतीने लग्नाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या मोहिमेत डाक निरीक्षक देगलूर सिंधू नानिर , पोस्ट मास्तर बिलोली येवतीवाड , ग्रामीण डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष बी. जी.भिलवडे , सुरेश रोडेवाड हे उपस्थित होते.