Home मराठवाडा दैठणा खुर्द येथे एकाच रात्री तीन चोऱ्या , “चोरट्यांनी पत्रकाराचेचं घर फोडले”

दैठणा खुर्द येथे एकाच रात्री तीन चोऱ्या , “चोरट्यांनी पत्रकाराचेचं घर फोडले”

30
0

परतुर – लक्ष्मीकांत राऊतजालना , दि. १६ :- तालुक्यातील दैठणा खु येथे चोरट्यांनी १५ फेब्रुवारी रोजी एकाच रात्री तीन घरात चोरी करून पाचतोळे सोने व पंचेचाळीस हजार नगदी लांवबल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.यात दैनिक पुढारी चे पत्रकार भारत सवने यांच्या घरिही चोरट्यानी डल्ला मारल्याने आष्टी पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
शनिवारी रात्री झोपेत असताना चोरट्यांनी कपाट व अलमारी फोडून ऐवज व नगदी रोकड लांबवली, दैठणा खु गावातील पत्रकार भारत हरिभाऊ सवने यांच्या घरातून दोन तोळे सोने व पंचवीस हजार नगदी,अरुणा बाई नारायण पांडे यांचे कपाट फोडून अडीच तोळे सोने व वीस हजार रुपये तर गोविंद राजाभाऊ सवने यांच्या कपाटातून एक तोळा सोने असा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची प्राथमिक माहिती आहे.दैठणा हे गाव आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत आहे.दैनिक पुढारी चे पत्रकार सवने यांच्याही घरी कपाटातून सोने व नगदी लांबवल्याने समावेश पोलिस यंत्रनेची डोकेदुखी वाढली आहे. चोरीची माहिती मिळताच आष्टी पोलीस पहाटेच दैठणा गावात दाखल झाले, जालना येथून डॉग स्कॉड बोलावण्यात आले असून माग काढला जात आहे. काही महिन्यांपूर्वी ही याच गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य अमृत सवने यांच्या घरी चोरी होऊन लाखोंचा ऐवज लांबवण्यात आला होता,त्याचा तपास लागला नसताना या चोऱ्या झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.या चोऱ्या प्रकरणात आष्टी पोलीसानी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. परतुर शहरात काही महिन्यांपूर्वी दोन पत्रकारांच्या घरात चोरी झाली होती,आता परत पत्रकार सवने यांच्याकडे चोरी झाल्याने परतुर पत्रकार संघाचे एक शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देणार आहेत.

Unlimited Reseller Hosting