Home मराठवाडा अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला ला तात्काळ अटक करा

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला ला तात्काळ अटक करा

123

समाज बांधवांनी दिले निवेदन…

लक्ष्मीकांत राऊत

परतुर / जालना , दि. ०८ :- परतुर शहरातील पारधी वस्तीतील एका 16 वर्षाच्या मुलीस बाजूच्या गल्लीत राहणाऱ्या एका तरुणाने फूस लावून पळविल्याची घटना 30 जानेवारी 2020 रोजी घडली होती,या घटनेला आठवडा उलटल्यानंतर ही परतुर पोलिसांना सदर मुलीचा शोध न लागल्याने 7 फेब्रुवारी रोजी पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांची भेट घेऊन या प्रकरणी जलद तपास करण्याची मागणी केली आहे.
30 जानेवारी रोजी रात्री अल्पवयीन 16 वर्षाची शालेय शिक्षण घेत असलेली मुलगी घरी एकटी असताना जवळच राहणाऱ्या नसीर काजी व त्याच्या मित्राने फूस लावून पळवून नेले अशा आशयाची तक्रार नातेवाईकानी परतुर पोलिसात 31 जानेवारी रोजी केली होती.त्यानंतर आठवडा उलटला तरी पोलिसांना मुलीचा ठावठिकाणा लावण्यात यश मिळाले नाही. परतुर पोलिसात कलम 354,363,366 अनव्ये या प्रकरणात गुन्हा नोंद आहे.अद्यापही मुलीचा तपास लागला नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली,त्यामुळे त्यांनी समाजाच्या शिष्टमंडळासह अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांची भेट घेऊन मुलीचा तपास लावण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे. पारधी समाजाच्या मुलीला भूलथापां देऊन पळवणाऱ्या चा त्वरित पकडून मुलीची सुटका करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी लवकरच या प्रकरणाचा छडा लावल्या जाईल असे समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे .परतुर चे उपविभागीय पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत, तर यासाठी दोन पोलीस पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.नसीर काजी हा विवाहित असल्याचीही माहिती कळते आहे. दरम्यान या प्रकरणाने पारधी समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर मुलगी ही आदिवासी समाजाची असल्याने पोलीस यंत्रणा वरही तपास लवकर लावण्याची मोठी जबाबदारी आहे.तर लवकर छडा न लागल्यास पारधी समाजाने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.