Home जळगाव रावेर तालुक्यातील पाल येथे एन एन तडवी उर्दू हायस्कूल येथे वार्षिक स्नेह...

रावेर तालुक्यातील पाल येथे एन एन तडवी उर्दू हायस्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन…!!

77
0

शरीफ शेख

रावेर , दि. ०८ :- जनकल्याण आदिवासी बहुउद्देशीय संस्था संचलित एन एन तडवी उर्दू हायस्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलनात माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी नासिर साहेब तडवी होते दीपप्रज्वलन हाजी बाबु तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ सर व एजाज़ सर यांनी केले सर्व मान्यवरांचे सत्कार पुष्प देऊन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कुरान पाकचे पठण करून सुरू करण्यात आले या कार्यक्रमात भरपूर देशभक्ती गीत व कव्वाली चे गायन करण्यात आले तसेच माजी विद्यार्थी मोहम्मद इस्हाक शेख व इम्रान तडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेचा इतिहास सांगितला व नविद सर यांनी सुद्धा शाळेचा इतिहास सांगितला या कार्यक्रमात गावातील सरपंच कामिल तडवी रुबाब साहेब तडवी सत्तार अक्रम अफजलखान युनूस शेख व गावातील नागरिक बहुत संख्यात उपस्थित होते.