Home मराठवाडा महिलेचा पाच महिन्यात दुसऱ्यांदा विनयभंग गुन्हा दाखल

महिलेचा पाच महिन्यात दुसऱ्यांदा विनयभंग गुन्हा दाखल

119

सययद नजाकत – बदनापूर

जालना , दि. ०८ :- एका पंचवीस वर्षीय महिलेचा सलग पाच महिन्यात दुसर्यादा विनयभंग केल्याने त्या महिलेच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदनापूर तालुक्यातील राजेवाडी खोडावडी येथील पंचवीस वर्षीय महिला पाच महिन्यांपूर्वी तिर्थपुरी येथे असताना शामराव शहाणे यांच्या शेतातील घरी अंबड तालुक्यातील खेडेगाव येथील गणेश प्रभू ब्राह्मणावत याने विनयभंग केला होता परंतु समजूत काढून प्रकरण मिटविण्यात आले होते,सदर महिला 3 फेब्रुवारी रोजी दुपारी राजेवाडी खोडावाडी येथे घरी असतांना पुन्हा त्या आरोपीने छेडछाड करून विनयभंग केला अशी तक्रार त्या महिलेने बदनापूर पोलीस ठाण्यात 8 फेब्रुवारी रोजी दिली असता आरोपी विरुद्ध गुन्हा कलम 354,452 अन्वये दाखल करण्यात आला आहे .

तसेच 8 फेब्रुवारी रोजी सोमठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवस्थानी सोमठाणा येथील एका व्यक्तीने दारू प्राशन करून येऊन महिला कर्मचऱ्यास शिवीगाळ केली अशी तक्रार आरोग्य अधिकाऱयांनी केली मात्र गुन्हा दाखल न करता तक्रार चौकशिवर ठेवण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे .