उत्तर महाराष्ट्र

कष्ट व जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते –  मिलिंद दीक्षित

शरीफ शेख

भुसावळ , दि. ०४ :- येथील महाराणा प्रताप विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. सन २०१९- २० या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा, परीक्षा यांत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे मा. मिलिंद दीक्षित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन कौतुक करण्यात आले.

संस्कारित होणे हे शाळेच्या लौकिकास साजेशी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे क्रीडा खात्याचे मंत्री सर्वांना माहीत नसतो परंतु क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याने व्यक्ती जगप्रसिद्ध होते असे मत मिलिंद दीक्षित जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री सोनुभाऊ मांडे, अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ तसेच संस्था सचिव श्रीमती उषाताई पाटील व संस्था सदस्य श्री डॉ. उदय भावे, श्री खणके सर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कवितांचे “काव्यांकुर” या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनी शाळेचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन शिक्षिका सौ सुरेखा चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन पालक सदस्य डॉ.श्री महाले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमने झाली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

You may also like

उत्तर महाराष्ट्र

मधुकर होन यांची राष्ट्रीय वारकरी परीषदेच्या चांदेकसारे शाखा अध्यक्षपदी निवड !!

कोपरगाव प्रतिनिधी  अहमदनगर – तालुक्यातील चांदेकसारे येथील मधुकर होन यांची राष्ट्रीय वारकरी परीषदेच्याश्री राम रतन ...
उत्तर महाराष्ट्र

राम लिलेची रंगभूषेचा पिढीजात वारसा जपतोय – रंगभूषाकार नाना जाधव

अयोध्या राममंदिर निर्माण विशेष नाशिक :- गेल्या ५० वर्षे आमच्या कुटुंबाने गांधीनगर येथील रामलिलेच्या पात्रांची ...
उत्तर महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये नाशिकच्या “स्ट्रेंजर्स” (strangers) महितीपटास प्रथम पुरस्कार जाहीर

नाशिक – निर्माता दिग्दर्शक लेखक विशाल पाटील या युवा फिल्ममेकर्सने निर्मिलेल्या “स्ट्रेंजर्स” (strangers) या सामाजिक ...
उत्तर महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीतून निराधाराना अन्नधान्य किराणा वाटप

नाशिक , दि. ०१ :- कोरोनाच्या काळात गाव,खेडे,पाडे येथील निराधार कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून ...