Home विदर्भ महाराष्ट्र आयकॉन 2020 पुरस्काराने विजय पचारे सन्मानित

महाराष्ट्र आयकॉन 2020 पुरस्काराने विजय पचारे सन्मानित

121

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०४ :- महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2020 या सन्मान सोहळ्याचे आयोजन समर्थ श्री सामाजिक प्रतिष्ठान, ठाकुर्ली (पूर्व), मुंबई च्या वतीने ठाकुर्ली (पूर्व) येथील नानासाहेब धर्माधिकारी हॉल मध्ये करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सिनेमा क्षेत्रातील मराठी चित्रपट अभिनेते नयन जाधव, हास्य सम्राट उपविजेते जॉनी रावत, साम मराठी टीव्ही चॅनल च्या वृत्त निवेदिका तृप्ती पालकर व संस्थेचे पदाधिकारी शिवरामजी चव्हाण अध्यक्ष, प्रमोद वासकर उपाध्यक्ष, दिनेश उलवेकर सचिव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्र इत्यादी विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रीयन मानाचा फेटा बांधून/ शॉल/छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त/सन्मान चिन्ह/ सन्मानपत्र आणि आरोग्य वर्धकएक वृक्षरोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
समर्थ श्री सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई च्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी हा सोहळा आयोजित केला गेला. महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पैकी वर्धा जिल्ह्यातील तळागाळात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, अल्प कालावधीत आपल्या सामाजिक कामाचा ठसा उमटवणारे विजय कमला तुकाराम पचारे, यांना महाराष्ट्र आयकॉन 2020 हा सन्मान प्रदान करण्यात आला. एका छोट्याश्या बोपापुर (दिघी), तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथे राहणारे विजय पचारे, गेल्या ८-१० वर्षा पासून सामाजिक भावनेने प्रेरित होऊन आपल्या माध्यम साक्षरता संस्थेच्या वतीने समाज सेवेचे काम करतात, वर्धा जिल्ह्यात वाचन संस्कृती रुजावी, नवीन पिढी वाचनाकडे वळावी म्हणून वाचन संस्कृती चळवळ सुरू केली, स्त्री- पुरुष समानतेच्या विषयावर काम करताना मोटर बाईक ने वर्धा ते बिहार, बिहार ते नेपाळ व नेपाळ ते वर्धा असा एकट्याचा चित्त थरारक प्रवास केला, सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे, भटक्या जमातीला शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी कार्य आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचे व संविधान जनजागृतीचे कार्य ते नव्या पिढीसाठी सतत करीत आहेत.
त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना शासनाचे व संस्था, संघटनांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र आयकॉन 2020 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.