Home विदर्भ हिंगणघाट येथील जळीत तरुणीचा वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून.!

हिंगणघाट येथील जळीत तरुणीचा वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून.!

138

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०४ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली असून दोषीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत.
तसेच या भाजलेल्या जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावेत, या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. असे मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.