
जळगाव:(शाह एजाज़ गुलाब)
४ मार्च २०२३ रोजी सकाळी ५ ते ८ दरम्यान एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. अलताफ पठाण व पो.कॉ. विशाल कोळी असे अँटी चेन स्नॅचींग डयुटी कामी असतांना पो.हे.कॉ. अलताफ पठाण यांना गुप्त माहिती मिळाली कि जळगाव एमआयडीसी येथे गुरांचा बाजार दोन महीला चोरीच्या बक-या विक्री साठी घेवून आल्या आहे. म्हणुन त्यांनी ही बातमी पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे यांना कळवून गुरांचा बाजार येथे गेले असता त्यांना सदर ठिकाणी दोन महीला या ६ बक-या घेवून उभ्या दिसल्या. त्यांना बक-यांबाबत विचारपुस केली असता त्या उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने सदर महीला उषा पांडुरंग काटे 50 वर्ष , सपना रविंद्र गोंधळी 32 वर्ष, दोन्ही रा.जळगाव जिल्ह्यातील सिरसोली यांना महीला पोलीसाच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी बक-या या बोराखेडी ता. मोताडा जि. बुलढाणा येथून चोरी केल्या असल्याचे सांगीतल्याने सदर बाबतीत बोराखेडी पो.स्टे. येथे माहिती घेऊन बोराखेडी पोलीस स्टेशनला ६ बक-या चोरी झाल्याबाबत तक्रार आलेली असल्यासंर्दभात माहीती मिळाली. बोराखेडी पोलीस स्टेशनला संर्पक करुन सदरच्या चोरी झालेल्या बक-या व संशयीत महीला नामे उषा पांडुरंग काटे वय 50, सपना रविंद्र गोंधळी वय 32 दोन्ही. रा. जळगाव जिल्ह्यातील सिरसोली यांना पुढील रितसर कारवाई साठी बोराखेडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. आनंदसिंग पाटील, स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अल्ताफ पठाण, दत्तात्रय बडगुजर, विशाल कोळी, राहुल रगडे, सचिन पाटील, म.पो.कॉ. राजश्री बाविस्कर, मंगला तायडे, आशा सोनवणे, म.होम. ललीता फिरके, इंगळे यांनी केलेली आहे.











































