Home महत्वाची बातमी पत्रकारितेत नव्यानेच येऊ पाहणाऱ्या निवोदीत पत्रकार मित्रांसाठी एक काल्पनिक विचारशील लेख.

पत्रकारितेत नव्यानेच येऊ पाहणाऱ्या निवोदीत पत्रकार मित्रांसाठी एक काल्पनिक विचारशील लेख.

197

गेल्या एक महिन्यापासून तो रोज फोन करायचा म्हणायचा मला मीडिया रिपोर्टर व्हायचंय फक्त एक संधी हवी मग पहा कसे दणाणून सोडतो सगळे दोन आठवड्यात तसा योगही आला, तीनचार वेळा नेला त्याला फिल्डवर दोन तीन महत्वाच्या व्हिजुअल्स घ्यायच्या होत्या,काही बाईट हि पाहिजे होत्या त्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी भेट दिली.

पहिले दोन दिवस तो चांगला रमला पण नंतर थोडा हिरमुसायला लागला का तर त्याच्या मनातली बोल्ड पत्रकारिता आणि आमच्या बरोबर फिल्डवर अनुभवत असलेली धकधकीची पत्रकारिता यात त्याला त्रास,उपाशीपोटी धावपळ, दगदग हेच पाहायला मिळत होते… त्या दिवशी एक महत्वाची बातमीसाठी गेलो, व्हिजुअल्स, बाईट,घेता घेता दुपार होऊन गेली त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले,त्या खेड्यात जवळ कुठेही हॉटेल नाही कि ढाबा नाही…
तो पिसाळला म्हनाला अरे जेवनाचे काय आता??? मी म्हणालो अजून एक दोन व्हिज्युअल हवेत ते घेऊ व्हिडिओ कन्व्हर्ट करू आणि मेल करून लगेच निघू म्हणजे बातमी लागण्यासाठी सर्व सोपे जाईल…. तेथून निघता निघता सायंकाळ होत आली… मग जवळ असणाऱ्या एका टपरी मधून भेळ घेतली आणि खाऊ लागलो, मगतर काय गडी खूपच उचकला,ओरडायला लागला,भुकेने उपाशी असताना भेळीने काय होणार???
मी म्हणालो फिल्डवर असेच असते… कधी खायला काही मिळते कधी काहीच मिळत नाही,
तो म्हणाला हे आपण कुणासाठी करतोय,का करतोय,यात आपला काय फायदा,आपण दुसऱ्यांसाठी आवाज उठवायचा,लढायचं आणि काम झालं कि हे लोक साधा फोनही करणार नाहीत… मी म्हणालो बाबारे हि पत्रकारिता फक्त लोकसेवेसाठीच असते,आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचे असते,त्यांना होणारा त्रास हा शासना पर्यंत पोहचवायचा असतो त्यातून त्यांच्यासाठी काही चांगले निर्णय होतात…..
त्या दिवशी तो शांत बसला रात्री एका हॉटेलवर आम्ही एकत्र जेवलो आणि नंतर घराकडे निघालो….
दुसऱ्या दिवशी एक ब्रेकिंग न्यूज आली… त्वरित तिकडे निघायचे होते, त्याला फोन केला तर त्याने उचललाच नाही,मी घाईत होतो त्यामुळे तडक निघालो…. पुन्हा एक तासाने त्याला फोन लावला तर त्याने एका शब्दातच सांगितले…….
अरे काय करायची आहे असली पत्रकारिता??? पोटाला पोटभर जेवण नाही कि घरच्यांना द्यायला वेळ नाही,आणि उलट अनेकांची दुश्मनी घ्यायची,अनेकांच्या रोषाचे कारण बनायचे,नुसते राब राब राबायचे आणि तेही कशासाठी तर लोकसेवेसाठी.. नाकोरे बाबा असली पत्रकारिता त्यापेक्षा मी एखादी चांगली नोकरी करून सुखी होईल…. मी गालातल्या गालात थोडा हसलो आणि पुढची बातमी करण्यासाठी निघालो…!