Home बुलडाणा भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काकाला पुतण्याने मारून टाकले ,

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काकाला पुतण्याने मारून टाकले ,

72

 

 

खुनाचा गुन्हा दाखल ,

अमीन शाह

बुलडाणा ,

जामोद येथील पेठ भागात राहणाऱ्या दीपक सुखदेव कुवर या 32 वर्षीय तरुणाने त्याचे मोठे काका किसन शंकर कुवर व कुटुंबीयांसोबत वाद चालू असताना वाद सोडवण्यासाठी गेलेले 65 वर्षीय वृद्ध आरोपीचे काका मधुकर शंकर कुवर यांना पुतण्या दीपक ने पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती यामध्ये मधुकर कुवर हे गंभीर रित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते उपचार सुरू असताना दिनांक 3 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान मधुकर कुवर यांचा मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी व पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गव्हाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला . घटनेच्या दिवसापासून फरार असलेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत . घटनेची तक्रार मृतकाचा भाऊ किसान शंकर कुवर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीपक सुखदेव कुवर यांच्या विरोधात अपराध नंबर 104/2023 कलम 302,323,504 भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी व पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गव्हाळे करीत आहेत . घडलेल्या घटने मुळे परिसरात दुःख व्यकत केले जात आहे ,