Home वाशिम महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस न्यायालयाने सुनावली 2 वर्ष साध्या कारावासाची व 2000/-...

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस न्यायालयाने सुनावली 2 वर्ष साध्या कारावासाची व 2000/- रु. दंडाची शिक्षा

63

 

फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन जऊळका येथे दि. 16/03/2014 रोजी फिर्यादी हिने फिर्याद दिली होती की, फिर्यादी हि संडासला गेली असता आरोपी नामे संतोष जितासिंग राठोड याने फिर्यादीचा लैगींग छळ करुन विनयभंग केला व शरीर सुखाची मागणी केली फिर्यादीने आरडाओरड केल्याने आरोपीने तिचे गळयातील सोन्याची पोथ कि.30000 रु. जबरीने घेवुन पळुन गेला तसेच कुणाला सांगीतले तर जिवाने मारण्याची धमकी दिली अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन पो.स्टे.जऊळका येथे अप.नं. 20/14 कलम 392, 354, 354(ब), 506 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. मानलवी यांनी केला असुन त्यांनी सदर गुन्हयाचा योग्य प्रकारे तपास करुन नमुद आरोपी विरुध्द मा.प्रथम वर्ग न्यायालय मालेगाव येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.मा.सह दिवाणी न्यायालयाच्या मा. न्यायाधिश पी.यु. कुलकर्णी यांच्या समक्ष सदर प्रकरण चालविले असुन दि.01/11/2022 रोजी मा. न्यायाधिश पी.यु. कुलकर्णी यांनी दोन्ही पक्षाची बाजु ऐकुन घेवुन आरोपी हा सदर प्रकरणात दोषी आढळुन आल्याने आरोपी नामे संतोष जितासिंग राठोड यास सदर गुन्हयात 2 वर्ष साध्या कारावासाची व 2000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे. आज आरोपीला शिक्षा झाल्याने पिडीतेस न्याय मिळाला आहे.
सदर प्रकरणी सरकार तर्फे सहा. सरकारी अभियोक्ता भास्कर एल. इंगळे यांनी कामकाज पाहीले तर मा.पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे सपोनि आजिनाथ मोरे यांचे मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पो. कॉ. विष्णु दिंडरकर ब.नं.235 यांनी
कामकाज पाहीले.