Home महत्वाची बातमी संघर्ष समितीच्या प्रयत्नाला यश, प्रलंबित मैत्रेय प्रकरणी मुंबईच्या सिटी सिव्हील अँड सेशन्स...

संघर्ष समितीच्या प्रयत्नाला यश, प्रलंबित मैत्रेय प्रकरणी मुंबईच्या सिटी सिव्हील अँड सेशन्स कोर्टात वकिलांची नियुक्ती

250

 

जालना -लक्ष्मण बिलोरे

लाखों गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. प्रकरणी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुंतवणूकदारांनी मैत्रेय विरोधात गुन्हे दाखल.सदर प्रकरण गेल्या सात वर्षांपासून कोर्टात खितपत पडले होते.गुंतवणूकदारांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने संगीता कदम या सामाजिक कार्यकर्तीने संघर्ष समीती स्थापन करून आवाज उठविला.मैत्रेय प्रकरण. समजून घेतले आणि गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाला गुंतवणूकदारांच्या बाजूने मुंबईच्या सिटी सिव्हील अँड सेशन्स कोर्टात वकीलांची नियुक्ती केली.

१९९८ साली सुरू झालेल्या मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने गुंतवणूकदारांना दामदुपटीने देण्याचे अमिष दाखवून राज्यभरात जाळे पसरविले.लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी १८ वर्षे आर्थिक देवाणघेवाण व्यवस्थितपणे केली.कोट्यावधींची मालमत्ता जमा होताच मैत्रेय कंपनीच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना परतावे देण्याचे थांबवले .२०१५-१६ च्या दरम्यान मैत्रेयने गाशा गुंडाळला यामुळे राज्यभरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली.मैत्रेय फसवणूक प्रकरणी नाशिक मधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला.मैत्रेयच्या चेअरमन वर्षा सत्पाळकरसह संचालकांना अटक करण्यात आली.सदर प्रकरण न्याय प्रविष्ट करण्यात आले,परंतु मैत्रेय मधील काही गद्दार टाॅप सिनिअर्सनी मैत्रेय संचालक मंडळातील लोकांशी हात मिळवणी करून गुंतवणूकदारांची दिशाभूल करत मैत्रेय प्रकरण कालबाह्य करण्याचा विडा उचलला,असा गुंतवणूकदारांचा आरोप आहे.गेल्या सात वर्षांत कोर्टात गुंतवणूकदारांच्या बाजुने वकिलही देण्यात आला नव्हता.हि गंभीर बाब संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा संगीता कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी थेट गृहमंत्रालय आणि न्यायालयाचे दार ठोठावले.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार एमपीआयडी कायद्याअंतर्गत
शासनाच्या वतीने जप्त केलेली मैत्रेय प्रापर्टीचा लिलाव करून गुंतवणूकदारांना परतावे मिळणार आहेत .संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता कदम यांच्या प्रयत्नामुळे मैत्रेय प्रकरणाला गती मिळाली असून मैत्रेय प्रकरण लवकरच निकाली लागण्याच्या मार्गावर आहे.