Home यवतमाळ खानदेश शिरोमणी अक्षय ऋषीजी म. सा. यांचे नगर आगमन सजोडे जाप व...

खानदेश शिरोमणी अक्षय ऋषीजी म. सा. यांचे नगर आगमन सजोडे जाप व प्रांतीय श्रीसंघ संगोष्टी अधिवेशन संपन्न

80

 

यवतमाळ – आज दि. 1 जुलै 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता केशव पार्क येथून विहार यात्रा करित खानदेश शिरोमणी उपप्रवर्तक तपमहर्षी प. पु. अक्षय ऋषीजी म. सा., प. पु. अमृत ऋषीजी म. सा., प. पु. गितार्थ ऋषीजी म. सा. आदि ठाणा 3 ने आज प्रथमच यवतमाळ शहरात नगर आगमन करुन केशव पार्क पासून विहार यात्रा प्रारंभ केली.

विहार यात्रे दरम्यान भगवान महावीर कि जय, गुरुदेव आचार्य आनंद ऋषीजी महाराजांची जयघोष देत ही यात्रा कॉटन मार्केट चौक, स्टेट बँक चौक, एलआयसी चौक, जिलाधिकारी कार्यालय, भगवान महावीर मार्ग, लाठीवाला पेट्रोल पंप मार्गाने मार्गक्रमण करित यवतमाळ पब्लीक स्कुल दर्डा नगर येथे प्रथम प्रवेश केला. या वेळी सकल जैन समाजाचे आधार स्तंभ किशोरबाबु दर्डा व लव दर्डा यांनी या विहार यात्रेचे स्वागत करुन मुनिश्रींचे आशिर्वाद घेतले. यवतमाळ पब्लीक स्कुलच्या प्रांगणात 150 सजोडे पैसष्टीया मंत्राचे जप आराधना करण्यात आली तर यवतमाळ जिल्हा प्रांतीय अधिवेशन निमित्त उपस्थित श्रीसंघाच्या पदाधिकार्‍यांना पुज्य श्री ने मार्गदर्शन केले तर लकी ड्रॉ च्या माध्यमातून समाज बांधवांना प्रोत्साहित करण्यात आले. या विहार यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने जैन जैनेतर बंधु भगिंनी शुभ्र वस्त्र व चुनरी साडी घालून सहभागी झाले होते. या चातुर्मास दरम्यान 108 अठाई, 1008 आयंबील व 223 तेला तप आराधना करण्याचे मुनीश्रींनी सांगितले. संघटन, सेवा, स्वाध्याय या तीन बाबी या चातुर्मासा अंतर्गत महत्वपूर्ण असल्याचे खानदेश शिरोमणी प. पु. अक्षय ऋषीजी म. सा. यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अयंबील तप तिकीटाचे विमाचेन जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा व जेष्ठ स्वाध्यायी अमरचंद गुगलिया यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अशोक कोठारी यांनी केले.