Home वाशिम मालेगाव पोलिसांची अंमली पदार्थविरोधात धडाकेबाज कारवाई, आरोपींसह 14.59 लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव पोलिसांची अंमली पदार्थविरोधात धडाकेबाज कारवाई, आरोपींसह 14.59 लाखांचा मुद्देमाल जप्त

23
0

 

फुलचंद भगत
मंगरूळपीर:-दि.१५.०४.२२ रोजी मालेगाव ते मेहकर रोड वर जय महाराष्ट्र राज्याचे मागे असलेल्या घरात काही इसम अमली पदार्थ अवैदयरित्या कब्ज्यात बाळगुन त्याची विकी करीत असल्याची गोपनिय बातमीदारा कडुन माहिती प्राप्त झाल्याने त्याप्रमाणे जय महाराष्ट्र काव्याचे मागे असलेल्या घरा मध्ये छापा टाकला असता आरोपी नामे १.सदामखान अब्दुल गणी वय २१ वर्ष रा.सोनगिरी ता.जि.निमज मध्यप्रदेश २.अस्लम शेख मुस्ताक शेख , वय ३३ वर्ष रा.बिबी ता.लोणार जि.बुलडाणा यांचे ताब्यातुन १.अफु चे झाडांची व फुलांची भुरकट रंगाची भुकटी एकुण ४१ किलो ७०० ग्रॅम ज्यांची एकुण किमंत ६.२५,५००/-रू. २. एका प्लास्टीक पारदर्शक पन्नी मध्ये व एका प्लॉस्टीक डब्यात काळया रंगाचा उग्र वास येत असलेला अफीम ज्याचे वजन १२१४ ग्रॅम ज्यांची एकुण किमंत ३,६४,२००/-
३.एका पांढ-या रंगाचे प्लॉस्टीकचे पोत्यात अफुचे फुलांचा व झाडाचा चुरा एकुण ४४.२५० किलोग्रॅम ज्यांची एकुण किमंत ४,४२.५००/-रू ४.एक सुजाता कंपनीचे मिक्सर व त्याचे पॉट किमंत ३५००/-रू ५.आरोपी सदामखान याचे अंगझडती मधुन नगदी २२००/-रू व एक मोबाईल किमंत १००००/-रू असा एकुण १२२००/-रू ६.आरोपी अस्लमशेख यांचे अंगझडती मधुन नगदी २१५०/-रू व एक मोबाईल किमंत ९०००/- असा एकुण १११५०/- असा एकुण १४.५९.०५०/-रू चा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे.मालेगांव येथे आरोपी १.सदामखान अब्दुल गणी वय २१ वर्ष रा.सोनगिरी ता.जि.निमज मध्यप्रदेश २.अस्लम शेख मुस्ताक शेख , वय ३३ वर्ष रा. बिबी ता.लोणार जि.बुलडाणा व सदर अमली पदार्थाची विक्री करीता जागा उपलब्ध करून देणारे ३.विजय श्रीराम गायकवाड रा.वडप ता.मालेगांव यांचेवर अप.क.१४४/२२ क.१५, १७, २२, २५ एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि.किरण वानखडे यांचे मार्गदर्शना मध्ये सपोनि.तानाजी गव्हाणे हे करीत आहेत. सदर ठिकाणी विकी करण्या करिता आरोपी हे वरील अमली पदार्थ कसा, कोठुन व कोणाकडुन आणत होते याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.


सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह साहेब, मा.श्री.अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे साहेब व उपविपोअ.मा श्री.सुनिलकुमार पुजारी साहेब यांचे मार्गदर्शना मध्ये पो.नि.किरण वानखडे सपोनि.तानाजी गव्हाणे , सपोनि प्रदीपकुमार राठोड ,सफी रवि सैबेवार , पोहेकॉ.कैलास कोकाटे , पोहेकों प्रशांत वाढणकर पोहेकॉ.गजानन झगरे नापोकॉ.सुधीर सोळके , नापोकॉ प्रेमदास आडे डाचालक नापोकों किशोर नवलकार , द्वाचालक नापोकॉ विजय डोईफोडे, यांचे पथकाने केली आहे.

Previous articleपांढरकवडा येथे योगेश देशमुख पारवेकरांचा सर्वोदय संकल्प यात्रे दरम्यान सत्कार
Next articleAmravati Collector Office | अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत 151 वर्षांची! दोन वर्षांत तयार होणार नवी इमारत. ‌ ‌‌
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.