Home यवतमाळ पांढरकवडा येथे योगेश देशमुख पारवेकरांचा सर्वोदय संकल्प यात्रे दरम्यान सत्कार

पांढरकवडा येथे योगेश देशमुख पारवेकरांचा सर्वोदय संकल्प यात्रे दरम्यान सत्कार

413
0

 

यवतमाळ – राजीव गांधी पंचायत राज संघटन व अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीच्या वतीने सर्वोदय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचमपल्ली तेलंगाना ते सेवाग्राम जवळपास 600 किलो मिटर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विनोबा भावे यांचा भुदान चळवळीत लोकनेते स्व. बाबासाहेब देशमुख पारवेकर यांनी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक जमीन जवळपास 3 हजार एकर जमीन दान केली होती. या निमित्त त्यांचे नातु कॉंग्रेसचे माजी जि. प. सदस्य देऊन जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बाळासाहेब धानोरकर यांचे शुभ हस्ते रामनवमीच्या शुभ दिनी पांढरकवडा येथे अग्रेसन भवन मध्ये सत्कार करण्यात आले. या प्रसंगी राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या अध्यक्षा मिनाक्षी नटराजन (माजी खासदार) अ. भा. कॉंग्रेस कमेटीचे सचिव व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, जिल्हा कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, राजीव गांधी पंचायत राज, प्रदेश अध्यक्ष संजय ठाकरे, माजी आ. कीर्ति गांधी, वामनराव कासावार, अ. भा. कॉंग्रेस कमेटी सचिव नाईक आदिंचा समावेश होता.


पांढरकवडा येथून राजीव गांधी पंचायत राजच्या वतीने सर्वोदय अमृत महोत्सवी वर्षा निमित्त काढण्यात आलेली पदयात्रा रामपूर येथे पोहचताच योगेश देशमुख पारवेकर यांच्या फर्म हाऊसवर पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Previous articleझारखंड येथुन परत आणला वाशिम पोलीसांनी मोबाईल
Next articleमालेगाव पोलिसांची अंमली पदार्थविरोधात धडाकेबाज कारवाई, आरोपींसह 14.59 लाखांचा मुद्देमाल जप्त
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.