Home वाशिम झारखंड येथुन परत आणला वाशिम पोलीसांनी मोबाईल

झारखंड येथुन परत आणला वाशिम पोलीसांनी मोबाईल

74

 

फुलचंद भगत
मंगरूळपीर:-वाशिम जिल्हा पोलीसांनी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात आणखी एक चमकदार कारवाई करत वाशिम येथे हरविलेला मोबाईल चक्क झारखंड येथुन शोधुन आणला आहे.
यामधील तकारदार विजय दशरथ चोपडे यांनी वाशिम सायबर सेल यांचे कडे कार्यरत असलेल्या CEIR पोर्टलवर त्यांचा ५२००० रू किंमत असलेला वनप्लस कंपनीचा मोबाईल हरविल्याची तकार दि.०७ फेब्रुवारीला २०२२ ला दीली होती सदर ची तकार प्राप्त होताच सायबर सेल येथील अंमलदार महेश वानखेडे यांनी सदर माबाईल चा शोध घेण्याची कार्यवाही केली.सदर मोबाईल चा शोध अवघ्या महीण्या भरात घेण्यात सायबरसेल वाशिम यांना यश प्राप्त झाले परंतु सदरचा मोबाईल राज्याबाहेर झारखंड येथे ट्रेस झाल्याने मोबाईल हस्तगत करणे हे एक आव्हान होते परंतु झारखंड पोलीस सायबर सेल येथील अंमलदार सपन कुमार व अभिषेक कुमार यांचे सहकार्याने सदरचा माबाईल परत मिळविण्यात आला.सायबर सेल वाशिम यांचे कडुन वर्ष भरात वाशिम शहर येथील एकुण ६९ पैकी ५५ तर कारंजा शहर येथील एकुण ४८ पैकी ४२ हरविलेल्या माबाईल चा शोध घेण्यात आला असुन एकुण २५१ अंदाजे किंमत ४० लाख रू च्या मोबाईलचा शोध घेण्यात आला असुन हरविलेल्या मोबाईल चा शोध घेण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात राबविली जाणार असल्याची माहीती सायबर सेल चे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली आहे.वाशिम सायबर यांच्याकडे CEIR हे पोर्टल कार्यान्वित असुन त्यादवारे मोठया प्रमाणात हरविलेल्या मोबाईल चा शोध लावण्यास मदत मिळत आहे. तरी वाशिम जिल्हयातील नागरीकांनी आपल्या हरविलेल्या मोबाईल चा शोध घेण्यासाठी www.ceir.gov.in या संकेत स्थळाचा वापर करण्याचे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी याद्वारे केले आहे.