Home यवतमाळ कुंभा सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व…!

कुंभा सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व…!

518

 

वडकी‌ / कुंभा – येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे ची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे बाराही सदस्याच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तर शेतकरी परिवर्तन पॅनलला खातही उघडता आले नाही.

येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक होऊ घातली होती. या निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे दोन्ही गटाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेदाचा वापर करीत जोरदार प्रचार करण्यात आला होता. काल 9 एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळा येथे मतदान पार पडले. यावेळी 621 मतदारांपैकी 534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे 12 पैकी बाराही उमेदवार निवडून आले. यात कवडु अड्रस्कर, देवाजी गोहणे, प्रभाकर घोटेकर, विठ्ठल डुकरे, शरद पावनकर, मारोती मत्ते, चरणदास वाढई, महादेव सोनुले, वनिता घोटेकर, उज्वला डाहुले, वरून ठाकरे, मुरलीधर बिलबिले यांनी विजय प्राप्त केला. सदर निवडणुक काँग्रेसचे नेते विजय बोथले, विजय घोटेकर, दिनेश डाखरे, राजू महाजन ,रमेश शंभलकर, अरुण गवारकर, गौतम उंमरे, सुमंत ठाकरे, राजू मांदाडे, सुभाष झाडे, देवानंद बिलेबिले, भोजराज चांदेकर, बंडू चौधरी, अमृत मेश्राम, रामभाऊ आत्राम, विलास आत्राम श्रीकृष्ण सोनुले. प्रविण बोथले , हनुमान जुमनाकेसह आदीच्या नेतृत्वात लढवली होती.