Home जळगाव “धक्कादायक” , सहा वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार

“धक्कादायक” , सहा वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार

459
0

 

वरनगाव: (एजाज़ गुलाब शाह) भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ६ वर्षीय मुलावर एका नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की,भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ६ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या सुमारास मुलगा घरी असतांना संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याने मुलाला जवळ बोलावून नविन बॉल घेण्यासाठी २० रूपये देतो असे सांगून त्याच्या घरात घेवून गेला व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
सदर धक्कादायक प्रकार मुलाच्या घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याच्यावर बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमरा दळवी करीत आहे.

Previous articleधक्कादायक.. पाचोऱ्यात दोघ मुलांच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून
Next articleकुंभा सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.