
पाचोरा : (एजाज़ गुलाब शाह) शहरातील भडगाव रोडवरील भास्करनगर भागात दोन मुलांच्या सहाय्याने पत्नीने पतीच्या पोटावर व छातीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली. पती हा माझ्या चारीत्र्यावर संशय घेत असून तो मला चाकूने वार करुन खून करण्याची धमकी देत असल्याने रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडलेल्या पती विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी उलट तपासणी केल्याने वडीलांचा खून आम्हीच केल्याची कबुली दोघ मुलांनी व पत्नीने दिल्याने पोलीसांनी तीघ संशयीतांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा पर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक भारत काकडे व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी भेट दिली.











































