Home साहित्य जगत दिलीप प्रभावळकरांचा हास्य चौकार! ‘हसगत’ आणि ‘पत्रापत्री’सोबत प्रभावळकरांची ‘गुगली-नवी गुगली’!

दिलीप प्रभावळकरांचा हास्य चौकार! ‘हसगत’ आणि ‘पत्रापत्री’सोबत प्रभावळकरांची ‘गुगली-नवी गुगली’!

25
0

 

अभिनयातील सहजता, नेमकेपणा, भूमिका निवडीतील चोखंदळपणा व स्वीकारलेल्या भूमिकांना न्याय देण्याची वृत्ती, अभिनय व लेखन या दोन्ही कलांनी मराठी नाट्य-चित्रपटक्षेत्रात आणि साहित्यक्षेत्रातही स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनिशी दिलीप प्रभावळकर यांनी आपले बळकट स्थान निर्माण करून प्रदीर्घ नाट्य-चित्र कारकिर्दीत घडवून प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशके राज्य केले आहे. विनोदी लेखनाची प्रचंड आवड असलेल्या प्रभावळकरांच्या साहित्य निर्मितील खटयाळ, मिश्कील, निरागस, खुमासदार शैलीद्वारे वाचक – श्रोत्यांसोबत संवाद साधण्याच्या विशेष हातोटीमुळे त्यांचा एक विशेष वाचक-रसिक वर्ग जगभर तयार झाला आहे. त्यांच्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे ‘स्टोरीटेल’ने नुकतेच त्यांच्या चार वेगवेगळ्या धाटणीचे लेखसंग्रह ऑडिओ स्वरूपात आणले आहेत. या सर्व लेखांचे सादरीकरण प्रत्यक्ष प्रभावळकरांच्याच आवाजात ऐकायला मिळत असल्याने हा एक दुग्धशर्करा योग म्हणता येईल.

क्रिकेट, खेळाडू, खेळाडूंचं वर्तन, मैदानाबाहेरील घडामोडी अशा अनेक गोष्टींवर प्रभावळकरांनी खुमासदार लेख लिहिले. खळखळून हसायला लावणारे, वरकरणी मनोरंजनात्मक भासणारे हे लेख विसंगती टिपणारे आणि चिमटे काढणारेही आहेत. या लेखांचा संग्रह म्हणजे ‘नवी गुगली’. ‘षट्कार’ या निखिल वागळे संपादित क्रीडा-मासिकात दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे ‘गुगली’. हा महत्वाचा ऐवज खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी दस्तुरखुद्द प्रभावळकरांच्याच आवाजात ऐकताना धम्माल मनोरंजन होते. यासोबतच त्यांचा विनोदी ललित लेखसंग्रह ‘हसगत’ ऐकतानाही अशीच मजा येत राहते.

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध… हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले ‘उदयोग’ हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत…तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिश्किलपणा या ‘पत्रापत्री’त रंगत आणतो. या सर्व विविधांगी मनोरंजन करणाऱ्या कथा स्वतः प्रभावळकर आपल्या शेजारी बसून आपल्याला ऐकवत आहेत असा भास ऐकणाऱ्याला होत राहतो.
*प्रभावळकरांचे खुमासदार लेखन ऐकण्यासाठी खालील लिंक पहा..*
*नवी गुगली* – https://www.storytel.com/in/en/books/navi-googly-1541238
*गुगली* – https://www.storytel.com/in/en/books/googly-1541228
*हसगत* – https://www.storytel.com/in/en/books/hasgat-1541217
*पत्रापत्री* – https://www.storytel.com/in/en/books/patrapatri-1541264

 

Previous articleदर्यापूरच्या माजी उपसभापती पिता-पुत्रासह चौघांवर गुन्हे दाखल . अंकुश दाळु. नकुल सोनटक्केवरील हल्ला भोवला : येवदा पोलिसांची कारवाई.
Next articleकारंजा तालुक्यातील राजनी येथे खुलेआम जुगार अड्डा सुरु.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.