Home मराठवाडा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळविण्यासाठीचे शेतकऱ्यांचे उपोषण, लेखी आश्वासनानंतर स्थगित

कर्जमाफी योजनेचा लाभ मिळविण्यासाठीचे शेतकऱ्यांचे उपोषण, लेखी आश्वासनानंतर स्थगित

421

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ आणि महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी वंचित शेतकरी आज २५ जानेवारी २०२२ पासून जांबसमर्थ ता.घनसावंगी जिल्हा जालना येथील कॅनरा बँक समोर उपोषणाला बसले होते.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देवून लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी उपोषण तुर्त स्थगीत केले आहे. अशी माहिती कर्ज माफितील वंचित शेतकरी आंदोलन समर्थक तथा या समितीचे अध्यक्ष किशोर बाबुराव मुन्नेमाणिक यांनी दिली.जालना जिल्हाधिकारी, पंचायत समिती घनसावंगी,कॅनरा बँक अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.शेतकऱ्यांना या कर्ज माफी योजनेतून का वगळण्यात आले ? याबाबत सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि या शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज माफी देण्यात यावी.या आशयाच्या निवेदनाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे सदर शेतकरी जांबसमर्थ येथील कॅनरा बँक शाखेसमोर उपोषणाला बसले बसलेहोते.किशोरमुनेमानिक,
गुलाबराव तांगडे ,शेख बशीर मनु. आबासाहेब गलबे.खोबराजी भिसे.उमरावबी शेख.जाफर शेख. लक्ष्मण हुलगंडे.नामदेव हुलगंडे.प्रकाश तांगडे भिमराव मोगरे, पाडुरंग गायकवाड ,हरिभाऊ गायकवाड,वसंतराव पवार. बापूराव मुळे,बाबुराव मुनेमानिक,सहाय्यक निबंधक सहकारी संस्थां घनसावंगीचे आशोक भिलारे ,बागर , लोंढे ,घनसावंगी पोलीस ठाणे अंतर्गतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप डोलारे ,पोहेका.केंद्रे, यसलोटे ,‌पोलीस पाटील भास्कर खाडे, उध्दवराव तांगडे,केनारा बॅक शाखा जांबसमर्थचे शाखा व्यवस्थापकासह ,उप शाखा व्यवस्थापक देशपांडे , या वेळी उपस्थित होते.