Home नांदेड ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम

ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम

193

महेंद्र गायकवाड

नांदेड –  जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक 2021-22 च्या अनुषंगाने मंगळवार 18 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी व बुधवार 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी 18 जानेवारी रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रापासून व 19 जानेवारी 2022 रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामव्यतीथ्रकत खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायती मधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूक 2021-22 साठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात मंगळवार 18 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत आणि बुधवार 19 जानेवारी रोजी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.
नांदेड तालुक्यातील सिद्धनाथ, त्रिकुट. अर्धापूर तालुक्यातील आमराबाद, आमराबाद तांडा, शेलगाव खु. देळुब खु, रोडगी. मुदखेड तालुक्यातील खांबाळा, हिस्सापाथरड. हदगाव तालुक्यातील महाताळा / वरुला, फळी चेंडकापुर, भाटेगाव, माटाळा. हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी. बिलोली तालुक्यातील तोरणा, रुद्रापुर, गागलेगाव, हिप्परगाथडी. देगलूर तालुक्यातील काठेवाडी, करडखेडवाडी. कंधार तालुक्यातील शिरसी खु. औराळ, रहाटी, मसलगा तर लोहा तालुक्यातील रायवाडी, हिंदोळा/करमाळा, लिंबोटी खरबी या ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुक कार्यक्रमात समावेश आहे.