Home विदर्भ युवकाला पोलीस ठाण्यात आणुन मारहाण

युवकाला पोलीस ठाण्यात आणुन मारहाण

1489

 आष्टी तालुक्यातील घटना

आरोपी वर ऍट्रॉसिटी अंतरंगत गुन्ह्याची नोंद

घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर स्वतःपोहोचले

इकबाल शेख

वर्धा – युवकाला आष्टी पोलीस ठाण्यात आणून मारहाण करून त्याचा व्हिडिओ बनवून आरोपी राजेश ठाकरे यांनी मारहानिचा व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल केले असता सह आरोपी पोलीस अंमलदार विनायक धवाट ला तडकाफडकी त निलंबित करण्यात आले.

आष्टी पोलीस ठाण्यात 29 डिसेंबर रोजी आरोपी। राजेश ठाकरे राहणार अंतोर यांनी फिर्यादी मंगेश तायवाडे चा विरोधात तक्रार दिली होती त्या अनुसार आष्टी पोलिसांनी सदर युवकाला पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करिता बोलाविले होते तेथे आरोपी राजेश ठाकरे ने फिर्यादी ला लाता भुक्या ने मारहाण करून त्याचे मारहाणी चे व्हिडीओ बनविले आरोपी राजेश ने फिर्यादी ला पोलीस ठाण्यातील पोलीस आरोपी ला भिती दाखविण्यासाठी ठेवलेल्या सुंदरी ने सुद्धा मारहाण केले व त्याचा सुद्धा व्हिडीओ बनवून फेसबुक वर वायरल केले.
सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल झाल्यावर फिर्यादी आपली बदनामी होईल या धाकाने मुंबई निघून गेला । फिर्यादी च्या वडिल भीमराव झिंगरुजी तायवाडे राहणार अंतोर यांनी आष्टी ठाण्यात तक्रार दिली की आरोपी ने मुलाला पोलीस ठाण्यात मारहाण करून व्हिडीओ वायरल केल्या मुळे माझा मुलगा मुंबई निघून गेला पोलिस विभागाने त्याचा मुला सोबत मोबाईल वर त्याची चर्चा घडवून दिली व मुलगा सुखरूप असून परत आष्टी येत आहे ,त्या नंतर पोलिसांनी आरोपी ला अटक करून सह आरोपी ला तात्काळ निलंबित केले , पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर ने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता स्वतः घटनास्थळी पोहचून माहिती घेतली पुढील तपास पोलीस विभाग करत आहे.