Home वाशिम महंत सुनील महाराज यांचे हस्ते ” मलुकी” या बंजारा ऐतिहासिक पुस्तकाचे अनावरण

महंत सुनील महाराज यांचे हस्ते ” मलुकी” या बंजारा ऐतिहासिक पुस्तकाचे अनावरण

464

दिनांक 26.12.2021 रोज रविवार ला अहिल्यादेवीची नगरी इंदौर (मध्यप्रदेश) येथे ” मलुकी” या बंजारा समाजाचे इतिहास दर्शविणाऱ्या पुस्तकाचे अनावरण पोहरादेवी येथील उच्च विद्या विभूषित महंत सुनील महाराज यांचे शुभ हस्ते अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शंकर भाऊ पवार नायक यांच्या विशेष उपस्थितीत तसेच राजू नायक, खुशिराम कापडी ( हरियाणा),पोपटराव नायक जामनेर,भगीरथ राठोड (इंदौर) प्रा.वसंत राठोड पुसद , मोहन जाधव बि.जे.पी.बण्जारा सेल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, मानसिंग बंजारा भरतपूर (राजस्थान )एडव्होकेट बद्रिप्रसाद चव्हाण नागपूर, शंकर जाधव (मुंबई) या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थित पार पडले.

बंजारा समाज व रुढी परंपरा, बंजारा इतिहास या विषयी सखल ज्ञानाची पकड असलेले जिज्ञासू व अभ्यासू व्यक्तिमत्त्व महंत सुनील महाराज यांनी आपल्या अमृत वानीने हजारो समाज बांधवांना मंत्रमुग्ध केले.
” मलुकी” या बंजारा ऐतिहासिक पुस्तकाचे वर्णन करताना ” मलूकी ” म्हणजे काय.या पुस्तकाच्या अभ्यासाने तमाम बंजारा बांधवांना आपल्या समाजा मध्ये जन्माला आलेली बुद्धिवान, सौंदर्यपूर्ण, साहसी विरंगना जीचे नाव “मलुकी ” आहे.त्यांच्या जीवन पटांची माहिती प्राप्त होईल.सदर पुस्तकात पूर्ण जीवनाचा इतिहास रेखाटण्यात आलेला आहे , सदर पुस्तकाचे लेखक जयराम पवार उप जील्हाधिकारी मुम्बई,महेश्चंद्र बण्जारा,डॉ.श्रीराम पवार सहायक आयुक्त,खुशिराम कापडी समाज सेवक (हरियाना) यानी लिखित केले आहेत असे मत पोहरादेवी, बंजारा काशी येथील महंत सुनील महाराज यांनी व्यक्त केले.