Home उत्तर महाराष्ट्र कडवईपाडा धरणासाठी निर्णायक पाठपुराव्यासाठी झाली बैठक

कडवईपाडा धरणासाठी निर्णायक पाठपुराव्यासाठी झाली बैठक

185

नाशिक –  गेल्या ५० वर्षे गरनदीवरील कडवाईपाडा येथील रखडलेल्या धरणासाठी अभियान जोमाने सुरू झाले आहे.त्याचाच नियोजित टप्पा म्हणून (दि १३)कडवाईपाडा येथील हनुमान मंदिरात कडवईपाडा धरण निर्मान कृती समितीच्या बैठकीत मंत्रालय,स्थानिक मंत्री, जिल्हाधिकारी,जलसंपदा,वन,पर्यटन विभागास पंचक्रोशीतील ३५ गावांच्या स्वाक्षरीसह सविस्तर ग्रामसभा, वनसमित्यांच्या ठरावांसह निवेदन देण्याचे प्रयोजन करण्यात आले .


कडवईपाडा येथे झालेल्या धरण कृती समितीच्या बैठकीत नियोजनबद्ध संबंधित खात्याना सविस्तर निवेदने पाठपुरावा,व दबावगट,आंदोलने याबाबत सविस्तरपणे मांडणी करण्यात आली.प्रस्तावनेत कृती समितीचे रमेश ठाकरे यांनी मूळ विषय व त्याची सविस्तरपणे मांडणी केली.याआधी झालेल्या बैठकीचे,समुदाय पत्रकार मायाताई खोडवे यांनी निर्मिलेल्या कडवईपाडा धरणाचे न्यूज स्टोरी व्हिडीओ वृतांत स्क्रिनिंग बाबत सांगितले,तर हभप जगदीश जाधव यांनी प्रशासकीय,राजकीय दुर्लक्षाने रखडलेल्या कडवईपाडा धरण निर्मितीसाठी तयार केलेल्या निवेदनाचे सविस्तरपणे वाचन केले त्या निवेदनात अपेक्षित बदल याबाबत सर्वांशी संवाद केला.अंबादास भुसारे यांनी त्या निवेदनाचे बाबत सकारात्मक दाखवून त्यात बुरुडेश्वर धबधबा पर्यटन रोजगार बाबत उल्लेख सुचवला.तर यावेळी जेष्ट साहित्यिक देवचंद महाले यांनी पेसा कायद्याची याबाबत अंमलबजावणी सुचवली.जर्नलिष्ठ ऍक्टिव्हिजम फोरमचे प्रवर्तक आनंद उर्फ दादाजी पगारे यांनी सविस्तरपणे पाठपुरावा करण्याबाबत नियोजनबद्ध मांडणी केली.तर जेष्ठ ग्रामविकास,जल संवर्धक यांनी सांगितले की,”कडवईपाडा धरण होणे ही या भागातील ३५ गावांची मूलभूत गरज आहे,मात्र वन विभागाच्या अडमुठे धोरणामुळे तसेच आजपर्यंतच्या या भागातील लोकप्रतिनिधींमूळ हे धरण १९७२ पासून अर्धवट आहे,रखडले आहे,यामुळं या भागात पिण्याचे पाणी, शेती,रोजगार,विकास नाही, या साठी पाठपुरावा प्रसंगी निर्वाणीचा लढा देऊ मात्र अखंडित विषयाची कास सोडायची नाही अशी मांडणी केली.यावेळी कडवईपाडा धरण निर्माण कृती समितीचे रामदास जाधव,अंबादास भुसारे,हभप जगदीश जाधव,रमेश ठाकरे,देवराम श्रुम,मनोहर लहारे,ज्ञानेश्वर भोये,रामदास लहारे,जयराम महाले,हिरामण वाघले,मुकुंदा जाधव,रमेश जाधव,छगन जाधव,निवृत्ती गायकवाड,सुभाष सहाळे यावेळी उपस्थित होते.बैठकीचे आभार रमेश ठाकरे यांनी मांडले.

राम खुर्दळ,पत्रकार
मो 9423055801