Home सातारा सातारा जिल्हातील मायणी येथे संविधान दिवस साजरा

सातारा जिल्हातील मायणी येथे संविधान दिवस साजरा

312

सतीश डोंगरे

मायणी दि. 26 (प्रतिनिधी) : “भारताचे संविधान हा देशाला अखंड व सार्वभौम ठेवणारा राष्ट्रीय ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी नागरिकांचे हक्क, अधिकार व कर्तव्ये जाणून घेण्यासाठी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना सहकार्य करणारी संविधान सभा यांच्याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे”, असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी हे होते.
प्रारंभी प्रा. शिवशंकर माळी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य मोकाशी म्हणाले, “भारतीय संविधान हे जगातील आदर्श संविधान आहे. या संविधानाने अनेक धर्म, जाती, भाषा, प्रांत अशी विविधता असणारा आपला देश एकसंघ ठेवला आहे, हे या संविधानाचे यश होय.” आभार प्रदर्शन प्रा. विकास कांबळे यांनी केले.