Home जळगाव मराठी गझलेचा खान्देशात उमटला ठसा मराठी भाषेचे संवर्धनाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद...

मराठी गझलेचा खान्देशात उमटला ठसा मराठी भाषेचे संवर्धनाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद –  कैलास कडलग

99

रावेर (शेख शरीफ )

खान्देशातील पाहिले राज्यस्तरीय गझल वैदर्भी सम्मेलन रावेर येथे आयोजित करण्यात आले होते .
या कार्यक्रमात मुशायरा एक चे सम्मेलन अध्यक्ष महाराष्ट्र अंकुर साहित्य संघ केंद्रीय अध्यक्ष प्रसिद्ध कवी प्रा हिम्मत ढाळे हे होते तर उदघाटन सेवा निवृत्त अभियंता डॉ प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले . प्रतिमा पूजन प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषारणी देवगुणे, पो नि कैलास नागरे, उद्योजक श्रीराम पाटील , यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख अतिथी  माऊली फौंडेशन अध्यक्ष डॉ संदीप अग्रवाल समाज अध्यक्ष संजय अग्रवाल माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन,जीप  माजी सदस्य रमेश पाटील, प्रा डॉ पी व्ही दलाल, सतीश जामोदकर, प्रा संजय कावरे, कामगार नेते दिलीप कांबळे, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक स्वागताध्यक्ष चंद्रशेखर भुयार यांनी केले. संमेलनास दिलीप कांबळे, रमेश पाटील ,पद्माकर महाजन,  यांनी मनोगत व्यक्त केले तर  प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी भाषणात म्हटले की, मातृभाषेला जपण्यासाठी या सारखे कार्यक्रम घेणे आवश्यक असून श्री भुयार आणि सर्व गझलकार मंडळी यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांच्या या मराठी जतनाच्या कार्याला आपण देखील हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ प्रमोद काकडे यांनी देखील खान्देशातील या पहिल्या सम्मेलनाच्या आयोजनाचे कौतुक केलं  तर हिम्मत ढाळे यांनी अध्यक्षीय  भाषणात मराठी गझल विषयी सविस्तर माहिती देऊन  बहिणाबाईंच्या खान्देशातील कवींचा गौरव देखील केला.
सूत्रसंचालन   दीपक नगरे यांनी केले  तर आभार डॉ संदीप पाटील यांनी मानले ,, या कार्यक्रमात रावेर येथील हिंदी कवी अरमान रावेरी यांनी मान्यवरांना इंसानियत या विषयावरील काव्य संग्रह भेट दिला.