Home नांदेड नांदेड – भोंदू बाबा चे पितळ उघडे….

नांदेड – भोंदू बाबा चे पितळ उघडे….

171

मजहर शेख, नांदेड

दैवी प्रकोपाची भीती दाखवून शिष्या कडून लाटले तब्बल 23 लाख रुपये!

नांदेड/माहूर,दि : १४ :- महाराष्ट्र राज्य सहा देशभरात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथे अनेक बाबांनी आपला अनधिकृत डेरा जमविला असून यातीलच एका भोंदू बाबा विश्वजीत रामचंद्र कपीले ने आयुर्वेदिक तिलस्मी उपचाराच्या नावाने एका रुग्णाच्या मजबुरीचा फायदा घेत दैवी शक्ती आपल्याला प्राप्त असल्याचे भासवून वेळोवेळी विविध कारणे देऊन बँकेतील आरटीजीएस व इतर स्त्रोत वापरून तब्बल २३ लक्ष १४ हजार ५४९ रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार पिढीत व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून केल्यानंतर भोंदू बाबाचा भांडाफोड झाला असून दिनांक १४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल होऊन आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून अटक करण्यात आली आहे.माहूर येथील स्वतःला दत्तप्रभूंचा अवतार संबोधनाऱ्या विश्वजीत रामचंद्र कपीले हा आयुर्वेदीक व अघोरी उपचार करत असून त्याला आलोकीक शक्ती प्राप्त आहे व तो अनेक रोगावर उपचार करतो.अशी माहिती मित्रा कडून प्राप्त झाल्याने कपिले बाबा यांची ओळख होऊन बाबाच्या होम हवन व इतर विधितून असलेला असाध्य आजार बरा होईल म्हणून तक्रार दार प्रवीण निवृत्ती शेरेकर राहणार कोपरगाव जिल्हा ठाणे हा कपिले बाबा यांनी टाकलेल्या जाळेत अलगद अडकला.उपचाराच्या नावावर अंधश्रद्धेचा वापर करून डिसेंबर २०१३ ते डिसेंबर २०२० यादरम्यान च्या काळात भोंदू बाबा विश्वजीत कपीले व त्यांनी सांगितलेल्या बैंक अकाउंट क्रमांकवर तक्रारदार याच्या बैंक अकाउंट क्रमांक मधून १६ लक्ष ५०,हजार रुपये आरटीजीएस द्वारे पाठवन्यात आले आहे.तक्रार दाराला विश्वजीत कपिले बाबा यास कुटुंब आहे व नागपुर येथे त्याचेवर फसवणुकिचा गुन्हा देखील दाखल आहे अशी माहिती मिळाली होती.तक्रार दार व शिष्यांना कपिले बाबा हा शारीरीक व मानसिक छळ करुन फसवणुक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर यासर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी रोजी तक्रारदार व उध्दव माने,राहुल आराध्ये असे शिष्य मिळुन कपिले बाबा याच्याकडे दत्तयोग आश्रमामध्ये व त्याच्या कुटुंबियाकडे पुसद येथे गेले असता रवि कपिले,कैलास कपिले,सारीका कपिले यांना आम्हांला का फसविले अशी विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देवून तुम्ही आमच्यावर कायदेशिर कारवाई केली तर आम्ही तुमच्यावर व तुमच्या परिवारावर करणी करुत व पोलीस कारवाई ची धमकी दिली. त्यामुळे आम्ही सर्व घाबरुन गेलो व विश्वजीत कपिले व त्याचे कुटुंबियाचे विरुध्द तक्रार दिली नाही.विश्वजीत रामचंद्र कपिले,रवि रामचंद्र कपिले कैलास रामचंद्र कपिले.सारीका रवि कपिले यांनी संगणमत करुन विश्वजीत रामचंद्र कपिले याचे अंगामध्ये दैवीशक्तीचा संचार असल्याचे भासवून व मला जादुटोनाची व आजारपणाची भिती दाखवून माझा शारीरीक व मानसिक छळ करुन माझ्याकडुन वेळोवेळी एकुण सोळा लाख पन्नास हजार रुपये आरटीजीएस द्वारे घेवून तसेच रोख स्वरुपात असे एकुन तेवीस लाख चौदा हजार पाच शे ऐकोण पन्नास रुपयाची फसवणुक केलेली आहे.तरी त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार तक्रारदार प्रवीण निवृत्ती शेरेकर राहणार कोपरगाव जिल्हा ठाणे यांनी दिली असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे व समिती कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर काल दिनांक१३ रोजी रात्री ११ वाजता भारतीय दंड विधानाच्या फसवणूक करणे, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू अधिनियमा सह इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यापक प्रकरणाचा तपास माहूरचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे करत आहे.