Home मराठवाडा ठाकरे सरकारची मदत म्हणजे “राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला” –...

ठाकरे सरकारची मदत म्हणजे “राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला” –  माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची टिका

169

सरसकट मदतीची शेतकऱ्यांची मागणी असताना व विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रचंड पाठपुरावा केला असला तरी शेतकरी विरोधी सरकार सत्तेत असल्याने भरघोस मदत होऊ शकले नाही काल जाहीर झालेले दहा हजार कोटीचे पॅकेज म्हणजे लबाडाचे आवडतं जेवल्याशिवाय खरं नाही प्रत्यक्षात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल याची कोणतीही शाश्वती नाही. खरंतर सरकारने केलेली मदत म्हणजे “राजा उदार झाला अन हाती भोपळा” दिला अशी अवस्था झाली आहे अशी टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

जालना- लक्ष्मण बिलोरे

तब्बल मागील ३४ वर्षातील विक्रमी ११३४ मिलिमीटर पाऊस जालना जिल्ह्यात झाला त्यात ५,१६,१७४ हेक्टर पीक उध्वस्त झालं, ५,७९,०४४ शेतकरी बाधित झाले, यासाठी अनुदान रुपये केवळ जालना जिल्ह्याला ३९३ कोटी ०७ लक्ष ०४ हजार एवढा निधी अपेक्षित होता परंतु प्रशासनाने सुरवातीलाच नकारात्मक भूमिका घेत १ लाख हेक्टर पीक गेलं म्हणून सांगितलं होतं, पत्रकार परिषद घेतली आणि प्रशासन खडबडून जागं झालं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी ०२ लाख ०८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित असल्याची माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आले, कमी नोंद दाखवा किंवा मदत मिळवून देता येईल असे पंचनामे करू नका असा प्रशासनावर दबाव होत का? असेल तर कुणाचा …? हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत लवकरच त्याचा छडा लावू असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

मराठवाड्यात ४५ लाखापेक्षा अधिक बाधित शेतकरी तर ३५ लाख हेक्टरपेक्षा अधिक पीक उध्वस्त उध्वस्त झाले असल्याचा सरकारी आकडा आहे परंतु प्रत्यक्षात मात्र ५० ते ५५ लाखापेक्षा अधिक शेतकरी बाकी असून ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिक उध्वस्त झालं आहे, अशा परिस्थितीत जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात
कोरडवाहू शेतीसाठी १० हजार रुपये हेक्टरी म्हणजे एकरी ४ हजार रुपये तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात
– कोरडवाहू शेतीसाठी २०,५०० /- रुपये हेक्टरी म्हणजे एकरी ८२०० रुपये एवढी मदत मिळाली होती. बागायती शेतीसाठी १५ हजार रुपये हेक्टरी म्हणजे एकरी ६ हजार रुपये मदत ठाकरे सरकारने जाहीर केले त्या तुलनेत
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बागायती शेतीसाठी ४०,५००/- रुपये हेक्टरी म्हणजे एकरी १६,२०० रुपये एवढी मदत दिली होती. फळ पिकांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी म्हणजे एकरी १० हजार रुपये मदत कालच्या पॅकेज मध्ये जाहीर करण्यात आली तर फडणवीस सरकारच्या काळात फळ पिकांसाठी ५४,००० रुपये हेक्टरी म्हणजे एकरी २१,६०० रुपये एवढी मदत देण्यात आली होती. हेक्‍टरी उत्पादन खर्च ३० ते ४० हजार रुपये असताना मदत मात्र १० ते १५ हजार रुपये करण्यात आली ही बाब स्वतःला शेतकऱ्यांचे सरकार म्हणणार यासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे तुलनात्मक दृष्ट्या विचार केला असता काल ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जाहीर केलेली मदत दुपटीपेक्षा अधिक होती असेच म्हणावे लागेल असे लोणीकर यावेळी म्हणाले

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांसाठी स्पेशल GR काढून दिलेली मदत पिकाच्या नुकसानीपोटी NDRF/SDRF निकषांच्या तिप्पट देण्यात आली होती फडणवीस सरकारच्या काळात कुटुंबांना सहनुग्रह अनुदान १०,०००/- प्रतिकुटुंब, जनावरांच्या गोठ्यासाठी अनुदान ३०,०००/-, दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे, नदीपात्र किंवा प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी – ३७५००/- रुपये प्रति हेक्टर म्हणजे एकरी १५००० रुपये एवढी रक्कम अनुदान देण्यात आली होती. याव्यतिरिक्त कृषिपंपाची वीजबिल माफ केले, त्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ केलं, विजेचे खांब पडणे, तारा तुटणे यासारख्या अनेक महत्वपूर्ण बाबींवर ठाकरे सरकार शब्द ब्र शब्द काढायला तयार नाही असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले

मागील पंचवार्षिक मध्ये शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजारांची मदत द्या अशी मागणी करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे शरद पवार साहेब मराठवाड्यात झालेल्या नुकसानाची पाहणी देखील आले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली होती ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील मान्य केली आहे. सरकारने काल जाहीर केलेल्या पॅकेज नुसार मिळणारी मदत ‘तुटपुंजी’ म्हणन्याइतकी सुद्धा नाही म्हणून आता शक्य नसेल तर रब्बीच्या पेरणीपूर्वी किंवा दिवाळी नंतर यापेक्षा वाढीव रकमेचा असाच दुसरा टप्पा देण्यात यावा अशी मागणी सुद्धा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची बैठक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी त्यावरचा शासन निर्णय ०६ ऑक्टोबर २०२१ ला आणि एका जिल्ह्याला देखील पुरणार नाही एवढी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांची मदत अख्ख्या महाराष्ट्रासाठी जाहीर करणे हा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नाहीतर काय आहे? असा सवाल देखील यावेळी लोणीकर यांनी केला

दिवाळीपूर्वी निराधारांचे अनुदान वितरित करा अन्यथा दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयात निराधारांचे उपोषण

संजय गांधी निराधार योजनेतील निराधार, विधवा, अपंग, परित्यक्ता, श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजाराने ग्रस्त यांच्यासह या योजनेतील अनेकांच्या मानधनाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असून कोरोना चे संकट व त्यात राज्य सरकारकडून यांच्या मानधनाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने हे निराधार लोक अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहेत या लाभार्थयांना मागील ३ महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही ते दिवाळी पूर्वी वितरित करण्यात यावे. अन्यथा ऐन दिवाळीच्या दिवशी या सर्वांना सरकार विरोधात उपोषणाला बसावे लागेल असा इशारा देखील यावेळी लोणीकर यांनी दिला.