Home विदर्भ कुरियर कंपनीचा माल घेवून जाणारा ट्रक पलटी

कुरियर कंपनीचा माल घेवून जाणारा ट्रक पलटी

171

इकबाल शेख

तळेगांव (शा.पं.) :- नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चिस्तुर नजीकच्या एका धाब्याजवळ गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपुर कडुन अमरावती कडे करीअर कंपनीचा माल घेवुन जाणारा ट्रक क्रं. एम. एच. ४० एन. २७९९ वरील मद्यधुंद असलेल्या चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर लावलेल्या लोखंडी कठड्याला धडकुन ट्रकचे समोरील दोन्हि चाक तुटल्याने रोडवर पलटी झाला.यामध्ये चालक विनोद बोटरे वडधामना हा किरकोळ जखमी झाला. ट्रक मधील कुरीअर कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे बाॅक्स मरोडवर अस्ताव्यस्त पसरले होते. त्यामुळे त्या बाजुची वाहतुक प्रभावित झाली होती.तळेगाव पोलिसांनी घटना स्थळावर जात वाहतूक सुरळीत केली.सदर घटनेची नोंद तळेगाव पोलीसांनी घेतली असुन पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात पी.एस.आय. पवनराज भांबुरकर.आशिष नेहारे.राहुल अमुने.रोशन करलुके हे करीत आहे.