Home अकोला आहो डॉक्टर साहेब हे बरं नव्हं ???

आहो डॉक्टर साहेब हे बरं नव्हं ???

1263

 

लिंगपिसाट डॉक्टर ला अटक ,

अमीन शाह

अकोला : कोण कधी काय करेल हे सांगता येणं कठीण आहे मात्र आज एका पत्रकारां मूळे प्रसिध्द डॉक्टर ला गजाआड व्हावे लागले आहे प्रसिद्ध डॉक्टरनं स्वत : च्या रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . डॉ . अनंत शेवाळे असं डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी या लिंग पिसाट डॉक्टर ला बेड्या ठोकल्या आहेत . डॉ . शेवाळे हे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध रोगतज्ज्ञ आहेत या प्रकरणी एका स्थानिक यूट्युब चॅनलच्या प्रतिनिधीनं तक्रार दाखल केली आहे . काही दिवसांपूर्वी पीडित व्यक्तीच्या मित्रासोबत डॉक्टरनं अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला . याबद्दलची सत्यता पडताळण्यासाठी तक्रारदार रुग्ण बनून डॉक्टराकडे गेला . त्यावेळी डॉक्टरांनी त्याचे कपडे उतरवले आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला . रुग्ण बनून गेलेल्या ‘ यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीनं या घटनेचं स्टिंग ऑपरेशन केलं . ही घटना ४ ऑक्टोबरला घडली . त्यानंतर व्हिडीओ पुराव्यांच्या आधारे तक्रारदारानं डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली . पोलिसांनी डॉक्टरविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .दरमियांन घडलेल्या घटनेची शहर भर चर्चा केली जात असून या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस पुढील तपास करीत आहेत ,