Home सोलापुर सहलीला गेलेल्या पोलीस पुत्राचा दुदैंवी मृत्यु.

सहलीला गेलेल्या पोलीस पुत्राचा दुदैंवी मृत्यु.

66
0

कुलू मनाली येथे घडली घटना; अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावावर शोककळा

वागदरी – नागप्पा आष्टगी
अक्कलकोट , दि. २३ :- तालुक्यातील वागदरी येथील समर्थ राजकुमार निंबाळे (वय १७) हा सहलीला गेला होता. त्याचा आज दिनांक २३-०२-२०२० रोजी पहाटे शालेय सहलीत कुलू मनाली येथे असताना हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे.

अतिथंड हवामानामुळे तेथेच त्याला हृदयविकाराचा धक्का आला त्यातच समर्थचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे़ समर्थचे वडील राजकुमार हे सोलापूर मुख्यालयात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. समर्थाच्या अशा दुदैवी व लहान वयात जाण्याणे वागदरी गावावर शोककळा पसरली आहे.

Unlimited Reseller Hosting