अमीन शाह
बुलढाणा , दि. २३ :- आज मलकापूर येथे सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन शहाजी राजे,नेताजी सुभाषचंद्र बोस,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या महापुरुषयांच्या समूर्तीस उजाळा दिला.
रयत क्रांती संघटनेच्या माजी युवती जिल्हाध्यक्ष निशा महाले पाटील यांनी सद्यस्थितीत राजकीय आरोप प्रत्याआरोप सत्ता संघर्षात कुठेतरी महापुरुषांचा पूर्व इतिहास नाहक उकरून काढून त्या महापुरुषांचे देशासाठीचे योगदान विसरून नको तो वादग्रस्त इतिहास समोर आणण्याचा प्रकार सर्वत्र होत आहे ,आपल्याकडून महापुरुषांचा सन्मान होत नसेल तर किमान आनादर तरी करू नये व सामाजिक राजकीय नेत्यांनी महापुरुषांच्या इतिहासाची तोडफोड थांबवावी असे परखड मत मलकापूर येथे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले , नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समूर्तींना उजाळा देतांना रयत क्रांती संघटनेच्या माजी युवती जिल्हाध्यक्ष तथा आपुलकी फाउंडेशनच्या संस्थापिका निशा महाले पाटील यांनी विचार व्यक्त केले.