Home बुलडाणा आर्थिक मदत करीत गावकऱ्यांनी निर्माण केला माणुसकीचा नवा आदर्श.

आर्थिक मदत करीत गावकऱ्यांनी निर्माण केला माणुसकीचा नवा आदर्श.

395

सुमितच्या उपचारासाठी ७१ हजाराची मदत…!

देऊळगाव माळी( प्रतिनिधी) कैलास राऊत ता .३० मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील ग्रामस्थांनी सुमित गवई या गरजू व्यक्तीला वैद्यकिय उपचारासाठी ७१ हजाराची मदत करीत समाजापुढे नवा आदर्श् निर्माण केला. गावातील कुठल्याही गोरगरीब व्यक्ति वर आलेल्या प्रत्येक अस्मानी सुलतानी संकटात देऊळगाव माळीकर वेळोवेळी संकटात सापडलेल्या दुःखीतांना आधार देण्याचे काम सातत्याने करत असतात.गावकऱ्यांनी निर्माण केलेल्या या आदर्शामुळे देऊळगाव माळी गाव पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याबदल चर्चेत आले आहे. एका महिन्यापूर्वी देऊळगाव माळी येथील सुमित गवईला चावल्यामुळे पायाला जखम झाली होती. तो शेतामध्ये खत पेरण्यासाठी गेला खत पेरून झाल्यावर प्रचंड पाऊस आला आणि तो पाऊस त्या जखमी मधून त्या खताचं प्रचंड इन्फेक्शन झाले. दुसऱ्याच दिवशी जॉबसाठी तो पुण्याला निघून गेला.त्याठिकाणी त्याचा पाय सुजू लागला सुजू लागल्यावर त्याला वाटले काही कीटक चावल्यामुळे पाय सुचला असेल. सुमित औरंगाबाद येथे डॉक्टरांकडे गेला असता डॉक्टरांनी सांगितले की तुला प्रचंड इन्फेक्शन झाल्यामुळे पाय सुजला. मेहकर येथील दवाखान्यात उपचार करण्याचे सुमितने ठरविले. त्यानुसान सुमितचा उपचार सुरू झाला. सुमितला पायाच्या उपचारासाठी दररोज २००० रूपये खर्च लागू लागला. मध्यातंरी वडील स्व.गजानन नामदेव गवई यांचे मृत्यूचे संकट सुध्दा आले.डॉक्टरांनी जखम जखम भरण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल असे व तोपर्यंत वैद्यकिय उपचारासाठी पैसा कसा उभा करायचा हा मोठा प्रश्न सुमित समोर उभा राहिला. डॉक्टरांनी त्याला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मात्र प्लास्टिक सर्जरीसाठी ५० ते ६० हजार रूपये लागणार असल्यामुळे सुमित चिंताग्रस्त झाला. मात्र देऊळगाव माळी येथील पत्रकार कैलास राऊत व डॉ.राहुल गवई यांनी सोशल मिडीयावर सुमितच्या पायाच्या प्लास्टिक सर्जरीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळला. सुमितच्या वैद्यकिय उपचारासाठी शेलगाव काकडे मित्र मंडळ 15000 वरोडी येथील मित्र मंडळ ५०००, प्रकाश भाऊ डोंगरे मित्र मंडळ 5000, लंगोटी यार ग्रुप 5000 यांच्यासह सुमित गवई यांचे वर्गमित्र व असंख्य शासकीय अधिकारी कर्मचारी , पदाधिकारी व गावकऱ्यांनी तब्बल ७१ हजार रूपयांचा निधी उभा करून तो सुमितकडे सुपूर्त केला. यामध्ये कुणी आपापल्या परीने एक हजार , पाचशे, दोनशे , शंभर रुपये अशी मदत केली यावेळी तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार कैलास राऊत, डॉ.राहुल गवई, व उपस्थित प्रकाश भाऊ डोंगरे मित्र मंडळाचे सदस्य देवानंद बळी राहूल सुरूशे, भिकाजी गवई, राजू गाडेकर सुमित ची आई पंचशीला गजानन गवई आजोबा नामदेव गवई आजी नर्मदा बाई व ग्रामस्थ उपस्थित होते.