
देऊळगावराजा , देऊळगावमही येथे भरतात आठवडी बाजार ,
प्रशासनाची अनदेखी ,
मंगेश तिडके ,
देऊळगावराजा ,
गेल्या काही आठवड्यापासून देऊळगावराजा व तालुक्यातील देऊळगावमही येथे मोठे आठवडी बाजार भरत असून याकडे देऊळगाव राजा नगरपालिकेचे व देऊळगाव मही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असून संबंधित प्रशासन या कडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे ,
राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र्रासह बुलडाणा जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत त्यात होणाऱ्या गर्दी मूळे आठवडी बाजार पूर्णतः बंद करण्यात आलेले असतांना शनिवार व रविवारला विकेंड लॉकडाऊन हा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून घोषित केला होता मात्र त्या आदेशाची एकप्रकारे पायमल्ली करीत आज देऊळगाव राजा येथे मोठा आठवडी बाजार भरला होता, बाजारात लोकांची एकच गर्दी झालेली दिसुन आली दुकानदार व ग्राहकांनी कुठल्याही मास्क चा वापर करीत नसल्याचे चित्र आज शहरात होते यासह सोशल डिस्टनसिंग नियमांचे तिनतेरा वाजल्याचे दिसुन आले जिल्ह्यात नविन कोरोना रुग्णाची संख्या जरी कमी असली तरी कोरोनाचा धोका मात्र कायम असुन तो शासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा एक भाग आहे, तिसऱ्या लाटेचा धोखा ही कायम आहे अश्यातच लोकांची होणारी गर्दी टाळणे हे प्रशासनाचे काम आहे मात्र प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहत आहे ,
*कुठेआहे विकेंड लोकडाऊन , ??*
शासनाने एक आदेश काढून शनिवार व रविवार ला विकेंड लॉकडाऊन ची घोषणा केली होती व सर्व काही दुकाने बाजार बंद करण्यात येत होते , मात्र तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून या विकेंड लॉकडाऊन ची अंमलबजावणी तालुक्यात होत नसल्याचे दिसून येत आहे जिल्हा प्रशासनाने या कडे लक्ष केंद्रित करावे ,
*मुख्यधिकारी मॅडम रजेवर ,*
गेल्या अनेक दिवसापासून देऊळगाव राजा येथील मुख्यधिकारी रजेवर गेले असून त्यांच्या अनुपस्थिती मुळे शहरातील अनेक कामे खोळंबली आहेत ,
*बाजार बंद कोण करणार ,* ?
जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाला डावलून शनिवारी देऊळगावराजा व रविवारी देऊळगाव मही येथे मोठे आठवडी बाजार भरत असून लोकांची एकच गर्दी होत आहे त्या मुळे कोरोना संसर्ग वाढन्याची भीती केली जात आहे , जिल्हाधिकारी साहेबाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचे आहेत मात्र ते ही उघळया डोळ्यांनी हे सर्व बघून याकडे डोळे झाक करीत आहे तरी जिल्हा प्रशासनाने त्वरित या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी अशी मागणी काही सुज्ञ नागरिक करीत आहे ,











































