Home मराठवाडा लातुरात साईनाका ते गरुड चौक चिखल ,खड्डे ,जिवघेणा पुल …..

लातुरात साईनाका ते गरुड चौक चिखल ,खड्डे ,जिवघेणा पुल …..

112

लातूर – शहरालगतच्या भागात साईनाका ते रिंगरोड हा रस्ता अंत्यत खराब झालेल्या अवस्थेत असुन तेरी भी चुप मेरी भी चुप सर्वच गुपचूप अशी दयनीय अवस्था झालेली असुन अखेर याला पालकत्व कोणाचे ‘ कोणी ‘ ” वाली ” आहे की नाही असे दिसून येते सध्या हवामान खाते आपले कर्तव्य बजावत असतांना पावसाळ्यात पावसाचा अंदाज देतो पण याच रस्त्या बाबत मात्र अनेक वर्षीपासुन प्रलंबित प्रश्न हा मात्र जशास तसा आहे थातुर मातुर डागडुगी करायची बील काढायचे नामे निराळे मोकळे पुन्हा रस्ता जैसे क्या तैसे असो पावसाळ्यात पावसाच्या चार सरी जरी पडल्या तरी साईनाका ते गरुड चौक या रस्त्यावर वाहन चालवयाचे म्हणजे कसरतच म्हणावी लागले आम्ही सुटलोरे ब..बा..पुलावरून असा श्वास.. सोडत दुचाकीस्वर जर कोठे पहावयास मिळत असतील तर साईनाका – गरुड चौक या अरुंद पुलावर जिवघेणा पुल झालाय जो डिमार्ट शेजारी पुल आहे येथे ज्याने प्रवास केला त्यालाच अनुभव आला म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही पण लोकप्रतिनिधी कींवा प्रशासन यांना काहीच देणेघेणे नाही का ?

असा प्रश्न उपस्थित होत आहे तर या भागातील नागरिक हि निवेदने देतात व आमची जवाबदारी संपली आता लोकप्रतिनिधी कींवा प्रशासनाचे हे काम आहे बघून घेतील व मोकळे होतात पण प्रश्न आहे सर्वीजनीक समुदयात विषय ठेवायला पाहिजे व त्याचा पाठलाग करने गरजेचे आहे हा प्रश्न समुदयाने सोडवायला हवा कारण या रस्त्यावर ज्यांना दररोज जाणे येणे आहे ते कसातरी रस्ता पार करतात पण नवीन प्रवासी यांना मात्र अंदाज येत नाही व अपघात होतो तेव्हा हि जवाबदारी व कर्तृव्य म्हणून एक नागरिक म्हणून किमान जिवधोक्यात घेऊन चालणा-या आमच्या माता – भगीनी असतील किंवा जेष्ठ असतील सर्वींना जिव महत्त्वाचा आहे याची जाणीव ठेवून हा प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे चिखल.खड्डे ,पुल याचा आज तरी सामना करावा लागत आहे असे संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे.