
मनिष गुडधे – पोलीसवाला
अमरावती – आज पुन्हा बुधवारी एका इसमावर खुणी हल्ला करण्यात आला ही घटना महादेव खोरी परिसरातील घडली आहे मृतक बाल्या उर्फ प्रनय सातनुरकर तो कार्पेंटर चा व्यवसाय करत होता त्याचा त्याच परिसरातील काही दिवसा अगोदर वाद झाला होता त्या वादात त्याच्यावर फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला कलम 307 , 326 हे दोन्ही गुन्हे मृतक वर दाखल झाले होते तोच वाद मनात ठेवून चार ते पाच जणांनी त्याच परिसरात बाल्या उर्फ प्रनयला गाटून त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले . घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात बाल्या पडून होता याची माहिती फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला होताच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम पोलीस निरीक्षक नितीन मगर उपनिरीक्षक गजानन सोनुले सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाहून एक चायना चाकू जप्त करण्यात आला बाल्या उर्फ प्रनयला उपचारादरम्यान नेत असताना त्याचा मृत्यू झाला बाल्या उर्फ प्रणय चे वडील फिर्यादी मधुकर सातनूकर यांच्या तक्रारीवरून मंगेश कावरे अनिकेत खिराडे विजय गुप्ता यांच्या सह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.










































