Home मराठवाडा ख्यातनाम किर्तनकार बाबासाहेब महाराज इंगळे यांचे निधन

ख्यातनाम किर्तनकार बाबासाहेब महाराज इंगळे यांचे निधन

624

जालना- लक्ष्मण बिलोरे

महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आहे.मागील पन्नास वर्षापासून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी धर्मप्रसार केला. विविध चैनल वर त्यांचे कीर्तने संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक ऐकत असत. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी असणारे बाबासाहेब महाराज इंगळे यांनी इंगळे महाराज परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून चिंचवडगाव परिसरातील राजा हरिश्चंद्र पिंपरी, पिंपरखेड, देवडी, काडीवडगाव, चींचोटी या गावांमध्ये धार्मिक वातावरणाला चालना दिली होती. परिसरातील सर्व गावांना ते आपलेच गाव मानीत होते. गावांमध्ये आठ आठ दिवस राहून अखंड हरिनाम सप्ताह करणारे महाराज सर्वांसाठी कुटुंबातील सदस्य वाटत होते. इंगळे महाराज इहलोकी निघून गेल्यामुळे भाविक भक्त आणि एकंदरीत संपूर्ण सांप्रदायिक क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराजांचे आठवण ही कायम येत राहील .