
करुणा धनंजय मुंडेंच्या पोस्टमुळे खळबळ…..
रवी गवळी ,
मुंबई
बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं खाजगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
कारण धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
यामुळे बलात्काराच्या आरोपानंतर शांत झालेला वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ आली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता.
पण आता करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
करुणा धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट-
“माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.
त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे,” असं सांगत करुणा धनंजय मुंडे यांनी सोबत फोटो शेअर केला आहे.
यामध्ये एक प्रेमकथा लवकरच असा उल्लेख असून खाली आश्चर्यजनक प्रेमकथा असंही लिहिण्यात आलेलं दिसत आहे.
करुणा यांची बहिण रेणू शर्मा यांनी पुढाकार घेत धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली होती.
पण नंतर त्यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचं सांगत तक्रार मागे घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कोणताही कारवाई न कऱण्याचा निर्णय घेतला होता.











































