Home विदर्भ ग्रामीण रुग्णालय कारंजा 62.5 के.व्ही. चे ला 5 लक्ष 40 हजार रुपये...

ग्रामीण रुग्णालय कारंजा 62.5 के.व्ही. चे ला 5 लक्ष 40 हजार रुपये च्या जनरेटर ची भेट..

47
0

 रविन्द्र साखरे

वर्धा –  कारंजा तालुक्यातील राजणी हे छोटेसे खेडे, जेमतेम लोकसंख्या व तेथील 5 ते 7 एकरात शेती करणारे

शेतकरी उत्तमराव धारपुरे यांचा 32 वर्षीय मुलगा प्रशांत उत्तमराव धारपुरे ज्याने परिस्थिती वर मात करीत आपले 10 वी पर्यंत चे शिक्षण सारवाडी येथील महात्मा फुले विद्यालय येथून पूर्ण केले व 11 वी 12 ला वर्धा येथून कृषि विषयक अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी चे शिक्षण कोल्हापूर येथुन कर्ज काढून व अत्यंत परिश्रमाने व जिद्दीने पूर्ण केले व अंतिमतः M.B.A चे शिक्षण पुणे येथे घेतले, शिक्षण घेतांना शेतकरी परिवारातील मुलाचा शिक्षणाचा संघर्ष त्याने जवळून अनुभवलेला आज बंधन ऍग्रोटेक प्रायवेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक व अशातच मागील वर्षापासून कोविड मुळे कारंजा येथे शिक्षक कॉलनी त असणाऱ्या आपल्या घरातुनच सर्व कामे सुरू असतांना कोविड च्या संकटात सापडलेल्या आपल्या शहरासाठी काय करता येईल हा विचार मनात घेऊन त्यांनी ग्रा. रु. कारंजा येथील वैद्यकीय अधीक्षक प्रभाकर वंजारी यांची भेट घेऊन कोविड रुग्णांसाठी कोवीड केयर सेंटर किंवा संस्थात्मक विलगिकरण कक्ष उभे करता येईल का ही विचारणा केली परंतु ते शकय नाही हे पाहताच उपलब्ध बायप्याप व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वापरतांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यास किंवा अन्य आरोग्य सेवा पुरवितांना विद्युत अभावी येणाऱ्या अडचणी समजून घेऊन 5 लाख 40 हजार रुपये किमतीचे 62.5 के.व्ही. चे जनरेटर व सोबतच 5 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे रुग्णांच्या सेवेत देणार आहे…
प्रशांत ने दाखवून दिलेले आहे की आपल्या कडे जेवढे पैसे कमविण्याचे कौशल्य असते तेच कौशल्य व मन त्याचा सदुपयोग करण्यासाठी असावा, एवढे होऊनही प्रसिद्धी पासून पूर्णतः दूर राहण्याचा मानस प्रशांत चा आहे परंतु समाजात आपल्यासारखे प्रेरणादायी युवक आहेत व त्या युवकांना समाजसमोर येणे गरजेचे आहे या माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी होकार दिलेला आहे, त्यांचे कार्य येथेच थांबलेले नाही तर अत्यंत हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अजून काही करता येईल का हा प्रयत्न सुद्धा त्यांचे वतीने सुरू आहे…