Home मराठवाडा दरोडेखोरांचा धुमाकूळ मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटला

दरोडेखोरांचा धुमाकूळ मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटला

22
0

दरोडेखोर फरार , “परिसर दहशतिचे वातावरण “

अब्दुल कय्युम

औरंगाबाद / वैजापूर , दि. १९ :- तालुक्यातील बेलगाव शिवारात चार दरोडेखोरांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातला. दोन वस्त्यावर टाँमीने जबर मारहाण करत दोघांना गंभीर जखमी करून रोख रकमेसह, सोन्याचे दागीने, मोबाईल असा लाखो रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशत पसरली आहे.
पिरन मन्सूरी (६०) रा. सुराळा व संजू राशीनकर (४५) रा. बेलगाव हे दोघे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. दोघावर शहरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बेलगाव शिवारात शेख शरीफ अन्वर यांची वस्ती आहे. शनिवारी त्यांच्याकडे सुराळा येथील रहिवाशी असलेले त्यांचे सासरे व सासू मुक्कामी आले होते. रात्री जेवण करून सर्वजण ओट्यावर झोपले. चाकूचा धाक दाखवत शेख यांना उठवले, शेख यांची पत्नी, सासू यांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने त्यांनी बळजबरीने काढून घेतले. तसेच घरात ठेवलेली रोख रक्कम, मोबाईल त्यांनी काढुन घेतले. शेख यांचे सासरे पिरन मन्सूरी यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या पायावर टाँमीने वार करून त्यांना दरोडे खोरांनी गंभीर जखमी केले. पावणे बारा वाजता ऐवज लूटून सर्वांना घरात कोंडून कडी लावून ते पसार झाले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा संजू राशीनकर यांच्या वस्तीकडे वळवला. तेथे त्यांच्या घरात प्रवेश करून दरोडेखोरांनी टाँमीने संजू यांच्या पायावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागीने, मोबाईल असा ऐवज लुटून पोबारा केला. तसेच त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. दरोडेखोर हिंदीत बोलत असल्याचे राशीनकर व शेख यांनी पोलीसांना सांगीतले. त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील अनिल धिवर यांना दिली. त्यांनी वैजापूर पोलीसांना दरोड्या बाबत कळवले. या दोन्ही वस्त्यावरील दरोड्या बरोबरच दरोडेखोरांनी वैजापूर येथे राहणारे नवनाथ शिवराम गायकवाड यांच्या शेतातील घर व कोपरगाव येथील रहिवाशी असलेले डॉ. मुरूमकर यांचे बेलगाव शिवारातील घर फोडले. मात्र या दोन्ही घरात कुणी राहत नसल्याने तेथे काहीच मिळाले नाही. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, फौजदार संजय सांळूके, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, फौजदार अमोल ढाकणे, ठसे तज्ञ, श्वान पथकासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.

Unlimited Reseller Hosting